शाहूवाडीतील या गावांत झाली प्रवेशबंदी

दिग्विजय कुंभार
Monday, 13 July 2020

दरम्यान, मलकापूर, सरुड, येळाणे या वर्दळीच्या प्रमुख ठिकाणी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. कंटेन्मेंट झोन व जनता कर्फ्यूमधील गावांत अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. 

आंबा ः खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) येथील स्थानिक डॉक्‍टरला कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बांबवडे परिसरातील दहा गावे कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट केल्याचे शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांनी जाहीर केले. 
दरम्यान, संबंधित डॉक्‍टरच्या स्वॅबचा रिपोर्ट रविवारी दुपारी पॉझिटिव्ह आला. या अगोदर त्यांचा खासगी प्रयोगशाळेत घेतलेला रिपोर्ट पॉझिटिव्हच आला होता. या डॉक्‍टरच्या संपर्कात आलेल्या आणखी 55 लोकांना क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या 90 झाली आहे. यापैकी 50 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांनी दिली. 
दरम्यान, मलकापूर, सरुड, येळाणे या वर्दळीच्या प्रमुख ठिकाणी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. कंटेन्मेंट झोन व जनता कर्फ्यूमधील गावांत अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. 
येथील स्थानिक डॉक्‍टरला झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्‍यता लक्षात घेता तालुक्‍यातील खुटाळवाडी, बांबवडे, डोणोली, वाडीचरण, सुपात्रे, साळशी, सोनवडे, भाडळे, चरण व ठमकेवाडी ही दहा गावे कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याचे जाहीर केले आहे. 
सात किलोमीटर क्षेत्रातील सरूड, खामकरवाडी, शिंपे, गोगवे, शित्तूर तर्फ मलकापूर, हणमंतवाडी, चरण, सैदापूर, थेरगाव, पाटणे, सावे, बजागेवाडी, व्हनांगडेवाडी, पिशवी, वरेवाडी, भैरेवाडी, सावर्डे बुद्रुक, पिंपळेवाडी, परखंदळे, कुंभारवाडी ही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट केली आहेत.

संपादन ः यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These villages in Shahuwadi were barred from entering