विवाहितेला जेसीबीसाठी जिवे मारण्याची धमकी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

सासरच्या मंडळीनी मुले होत नसल्याच्या कारणांतून आयेशा हिचा शारिरीक व मानसिक छळ केला.

इचलकरंजी - जेसीबीसाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेला जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह पाच जणांवर शहापूर पोलिसांत ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आयेशा इम्रान द्राक्षी (वय 26, रा. मणेर कॉलनी, विजापूर, सध्या रा. तारदाळ)यांनी तक्रार दिली आहे. 

पती इमरान रफीक अहमद द्राक्षी, सासू जायदा रफिकअहमद द्राक्षी, सासरे रफिक अहमद जाफर साहब द्राक्षी, दीर सरफराज रफिक अहमद द्राक्षी (सर्व मणेर कॉलनी, विजापूर, कर्नाटक) आणि नणंद आस्मा हफिजहुसेन सातारकर (नेहरूनगर, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

हे पण वाचाह्रदयद्रावक! आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच

याबाबत पोलिसांनी दिलेली अधित माहिती अशी, सासरच्या मंडळीनी मुले होत नसल्याच्या कारणांतून आयेशा हिचा शारिरीक व मानसिक छळ केला. पती इम्रानने घरातील पडद्याच्या पाईपने केलेल्या बेदम मारहाणीत त्या बेशुद्ध पडल्या. तसेच अंगावरील दागिणे काढून घेऊन त्यांना घराबाहेर हाकलून दिले. याबाबत आज आयेशा यांनी पोलिसांत तक्रार दिली. याबाबत पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा नोंद केला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatened to kill the married woman in ichalkaranji