
कोल्हापूर - प्रतिभानगर ते सुभाषनगर रस्त्यावरील फ्रोटिंग गार्डन अपार्टमेंटमधील महिला पॉझिटिव्ह आल्याने हे अपार्टमेंट सील केले. दरम्यान बाधित महिला घरातून बाहेर अनेक आवाहने केल्यानंतर तब्बल तीन तासानंतर ही महिला घरातून बाहेर आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, रमणमळा चौकातील डॉक्टराचाही अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. शहरातही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आजअखेर शहरात 150 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 40 बरे झाले आहेत. उर्वरितावर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांवर चांगले उपचार व्हावेत, क्वारंटाईन नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिका प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत आहेत. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त निखिल मोरे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, साथरोग अधिकारी डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश पावरा, डॉ.अमोल माने आदींचे पथक कार्यरत आहेत.
शहरातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. गंजीमाळ, वारेवसाहत येथील रुग्णांची संख्या 27 वर पोहचले. शहरातील अन्य परिसरातही रुग्ण सापडत आहेत. कसबा बावडा, रमणमळा, कदमवाडी, टाकाळा, राजारामपुरी, गंजीमाळ, राजोपाध्यायनगर, फुलेवाडी, कणेरकरनगर, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, जाधववाडी, मुक्तसैनिक वसाहतीसमोर आदी ठिकाणी रुग्ण सापडले आहेत. आजवर शहरात सुमारे 150 रुग्णांची नोंद झाली आहे.
ऍस्टर आधार करणार व्हीसीद्वारे उपचार
ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत; पण अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व जे सीपीआरमध्ये उपचार करून घेण्यास तयार नाहीत, अशा रुग्णांची व्यवस्था जोतिबा हॉटेंल येथे केली आहे. या रुग्णांवर ऍस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपचार करणार आहेत, अशी माहिती महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
शहरातील सद्यःस्थिती
आजवरची रुग्णसंख्या 150
बरे झालेले रुग्ण : 40
मृत्यू : 5
एकूण कंटेनमेंट झोन : 43
सध्या सुरू असलेले कंटेन्मेंट झोन : 23
मुदत संपलेले कंटेनमेंट झोन : 20
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.