कोल्हापुरात 9 दिवसात कधी,किती, कसे सापडले कोरोना पाॅझिटिव्ह ? वाचा ग्राफिक्सच्या माध्यमातून...

सदानंद पाटील
मंगळवार, 26 मे 2020

चिंताजनक प्रवास सुरू : बहुतेक सर्व बाधित बाहेरून आलेले

कोल्हापूर - संपूर्ण जगभर कोरोनाचे थैमान सुरू झाले आणि भारतात त्याविरोधात 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्या आधीच महाराष्ट्रात लॉकडाउन लागू करण्यात आले. पाठोपाठ देशभर लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर 25 मार्चला कोल्हापुरात पहिला रुग्ण सापडला आणि 16 मेपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या कमी-जास्त होत राहिली. जिल्ह्यात पहिल्या दोन टप्प्यांत कडकडीत लॉकडाउन पाळण्यात आले; मात्र तिसऱ्या लॉकडाउनमध्ये 17 मे नंतर अनेक बाबींमध्ये सूट मिळाली. त्याचा परिणाम दिसू लागला. 17 मे 25 मे या 9 दिवसांत जिल्ह्यात 342 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यातील 90 टक्‍के लोक मुंबई, पुण्यासह रेड झोनमधून आलेले आहेत.

जिल्ह्यात अवघ्या 9 दिवसांत
342 कोरोनाबाधित आले!

लॉकडाउन सुरू होताच शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, रेल्वे, विमानसेवा, उद्योग व्यवसाय, धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर भाविकांना बंदी करण्यात आली. राजकीय कार्यक्रम, मेळावे रद्द करण्यात आले. अभयारण्ये बंद करण्यात आली. त्यानंतर सरकारी कार्यालयातील उपस्थिती टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आली. ती 5 टक्‍क्‍यांवर आणण्यात आली. 17 मे नंतर लॉकडाउन शिथिल झाले आणि परजिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. त्यातून कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढू लागले.

तारीख कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या

 • 25 मार्च 1
 • 29 मार्च 1
 • 5 एप्रिल 1
 • 6 एप्रिल 1
 • 9 एप्रिल 1
 • 11 एप्रिल 1
 • 15 एप्रिल 1
 • 18 एप्रिल 1
 • 19 एप्रिल 2
 • 21 एप्रिल 1
 • 25 एप्रिल 1
 • 29 एप्रिल 1
 • 30 एप्रिल 2
 • 9 मे 3
 • 12 मे 3
 • 13 मे 4
 • 14 मे 1
 • 15 मे 9
 • 16 मे 1
 • 17 मे 19
 • 18 मे 32
 • 19 मे 49
 • 20 मे 46
 • 21 मे 46
 • 22 मे 33
 • 23 मे 25
 • 24 मे 55
 • 25 मे 37

 

 • 25 मार्च ते 16 मे - 23 दिवसांत 36 कोरोना पॉझिटिव्ह
 • 17 मे ते 25 मे - 9 दिवसांत 342 पॉझिटिव्ह
 • 25 मे अखेर रुग्ण - 378 पॉझिटिव्ह

वयोमानानुसार रुग्ण

1 वर्षाआतील 0

 • 1 ते 10 वर्षे 33
 • 11 ते 20 वर्षे 49
 • 21 ते 50 वर्षे 255
 • 51 ते 70 वर्षे 37
 • 71 वर्षापुढील 1
 • एकूण - 378

तालुकानिहाय कोरोनाबाधित

 • शाहूवाडी 119
 • राधानगरी 48
 • भुदरगड 49
 • चंदगड 25
 • महापालिका 21
 • पन्हाळा 11
 • आजरा 32
 • गडहिंग्लज 13
 • कागल 11
 • करवीर 11
 • गगनबावडा 6
 • इचलकरंजी न.पा. 6
 • शिरोळ 5
 • हातकणंगले 4
 • जयसिंगपूर न.पा. 3
 • कुरुंदवाड न.पा. 1
 • इतर जिल्हा, राज्य 5
   

25 दिवसांत आले 34 हजार लोक

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1 मेपासून 25 मेअखेर 34 हजार 878 नागरिक आले आहेत. त्यांचे 1470 ठिकाणी अलगीकरण केले आहे. यातील कोविड केअर सेंटरमध्ये स्वॅब घेतलेल्यांमध्ये 223 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर 3495 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर 5671 लोकांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

शाहूवाडी ऑक्‍सिजनवर

जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण शाहूवाडी तालुक्‍यात सापडले आहेत. तेथे आतापर्यंत 112 रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. अद्यापही किमान 5 हजारांवर नागरिक मुंबई, पुणे व इतर भागातून येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred and forty two corona were affected in Kolhapur district in nine days