सिगारेट फुकट न दिल्याच्या रागातून घरात दहशत माजवत केला हल्ला; कुटुंबातील तिघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

मणेर मळा येथे घरात घुसुन हल्ला 

कुटुंबातील तिघे जखमी ः दोघे हल्लेखोर ताब्यात 

गांधीनगर (कोल्हापूर) : सिगारेट न दिल्याच्या रागातून घरात घुसून संशयित हल्लेखोर नागेश साळोखे यांच्यासह दहा- बारा जणानी दहशत माजवत केलेल्या तलवार आणि ऍल्युमिनियम बारच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले. आकाश रमेश पैठणकर, त्याची पत्नी सौ. रेश्‍मा आकाश पैठणकर व आई कमल रमेश पैठणकर (रा.साईनाथ कॉलनी, मनेर मळा उंचगाव) अशी जखमींची नावे आहेत. 

या पैठणकर कुटुंबावरील हल्ल्यात मुलगा आकाश व आई कमल गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार रविवारी दुपारी अडीचच्या दरम्यान उचगावपैकी मणेर मळा येथील साईनाथ कॉलनीमध्ये झाला. नागेश साळोखेसह दोघांना गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी सांगितले. 

हेही वाचा- अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी  मुंबई पोलिसांच्या ताब्यात

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी :

पैठणकर कुटुंबाची पान टपरी आहे. या टपरीवर नागेश साळोखे शनिवारी रात्री उशिरा टपरी बंद झाल्यानंतर सिगारेट फुकट मागण्यासाठी गेला. पैठणकर यांनी सिगारेट देण्यास नकार दिला. या रागातून साळोखेसह संगनमताने दहा-बारा जणांनी पैठणकर यांच्या घरात घुसून ऍल्युमिनियम बार व तलवारीने हल्ला केला. आकाशवर वार होत असताना आई कमल यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कमल यांच्या डोक्‍यावर वार बसला व त्यानंतर तो वार आकाशच्या पाठीवर बसला. आकाशची पत्नी रेश्‍मा यानांही मारहाण झाली. मुलगा आकाश व आई कमल यांना रुगणालयात दाखल केले आहे.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three members of the family injured