
विद्यापीठात ८४ नियमित प्राध्यापक कार्यरत आहेत. तर ७८ सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी पद्धतीवर काम करतात
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील ७८ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याला मान्यता मिळाली. तसेच पुढील पंधरा दिवसांत प्राध्यापक भरती संदर्भात कार्यवाही करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
विद्यापीठात ८४ नियमित प्राध्यापक कार्यरत आहेत. तर ७८ सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी पद्धतीवर काम करतात. या प्राध्यापकांचा करार मार्च महिन्यामध्ये संपला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी या प्राध्यापकांना मुदतवाढ दिली होती.
हे पण वाचा - महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय
सोमवारी (ता. ७) त्यांचा मुदतवाढीचा करारही संपणार होता. त्यामुळे आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेचे मध्ये चर्चा झाली. या बैठकीला कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे