इचलकरंजीला बसला झटका : आई मुलगीसह एक नातेवाईक पॉझिटिव्ह...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

सायंकाळी कोल्हापूर येथे 23 आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामध्ये इचलकरंजी येथील रुग्णांचा समावेश आहे.

इचलकरंजी (कोल्हापूर): सायंकाळी कोल्हापूर येथे 23 आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामध्ये इचलकरंजी येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराला रात्री मोठा झटका बसला आहे. गेले अनेक दिवस कोरोना पासून दूर राहिलेल्या या शहरात आता आणखीन तीन रुग्ण वाढले आहेत.

हेही वाचा- संध्याकाळी पून्हा एकदा झटका : कोल्हापूरमध्ये आणखी २३ कोरोना पॉझिटिव्ह..

यापूर्वी शहरात एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले असून त्यातील दोन रुग्ण उपचार होऊन बाहेर आले आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे .गेले अनेक दिवस हे शहर चिंतामुक्त होते मात्र रात्री आलेल्या रिपोर्ट मुळे शहराला आता चिंता लागली आहे. आज दिवसभर तपासून आलेले 120 अहवाल निगेटिव्ह होते मात्र रात्रीच्या 23 रुग्णात इचलकरंजीच्या तीन रुग्णांचा समावेश झाला आहे.ते तीन रुग्ण एकाच घरातील असून त्यात अठ्ठावीस वर्षांची आई आठ वर्षाची मुलगी व 26 वर्षाची एक नातेवाईक आहे शहरातील कृष्णा नगर भागात हे सर्वजण हातात सध्या ते शहराबाहेरील एका शाळेमध्ये इन्स्टिट्यूट क्कारंन्टाईन होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three more corona patients in ichalkaranji