ब्रेकिंग - कोल्हापुरात आणखी अकरा जणांना कोरोनाची लागण ; इचलकरंजीत कहर सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कुडचे  मळा संपर्कातील आत्तापर्यंत रुग्णांची संख्या 30 वर जाऊन पोहोचले असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 32 झाली आहे.

कोल्हापूर  : जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संखेत भर पडतच आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात  नवीन 11 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यात हातकणंगले तीन, शाहूवाडी दोन,
गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, चंदगड तालुक्यात प्रत्येकी एक पाॅझिटीव्ह रूग्ण आढळला आहे.  
 

सलग सातव्या दिवशीही इचलकरंजीत कोरोनाचा कहर सुरूच ; आज आणखी तिघांना लागण

इचलकरंजी  शहरात सलग सातव्या दिवशी कोरोनाचा कहर सुरूच राहिला आहे. दररोज या शहरात रुग्ण संख्या वाढत असून आज दिवसभर जिल्ह्यात एकही रुग्ण नाही असा सुस्कारा टाकत असताना रात्री नऊ वाजता इचलकंजी येथील बाळ नगर येथील दोन आणि गुरूकनगर येथील एक असे तीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मॅंचेस्टर नगरीचा भीती कायम राहिली आहे. 

कुडचे  मळा संपर्कातील आत्तापर्यंत रुग्णांची संख्या 30 वर जाऊन पोहोचले असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 32 झाली आहे.
 इचलकरंजी शहराने लॉकडाउनच्या काळात कोरोनाच्या मुक्तीसाठी चांगली दक्षता घेतली होती. मात्र गेल्या सात दिवसात या इचलकरंजी शहरातील रुग्णांची संख्या प्रत्येक दिवशी वाढतच चालली आहे. सात दिवसांपूर्वी सात असणारी संख्या आता तब्बल 40 वर जाऊन पोहोचली आहे. आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यातील एकही रुग्ण कोरूना पॉझिटिव आला नाही. त्यामुळे जिल्ह्याने सुस्कारा सोडला होता. मात्र रात्री नऊ वाजता बाळ नगर परिसरातील यापूर्वीच कोरणा पॉझिटिव असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांचा समावेश आहे. यामुळे आता इचलकरंजी शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 32 वर जाऊन पोहोचली आहे. तर सहा रुग्ण यापूर्वीच बरे होऊन आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. 

हे पण वाचा -  ...अन्यथा आंदोलन ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

शहरात काल एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या त्रिशुल चौक परिसरातील संपर्कात आलेल्या अनेकांचे  स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचेही अद्याप रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे वस्त्र नगरीची भीती अद्यापही कायम आहे. शहरात वारंवार वाढणाऱ्या या रुग्ण संख्येमुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three new corona positive case in kolhapur ichalkaranji