लता दीदी, सचिन म्हणतात, 'घरातच बसायचं...!'

Through the mimicry of celebrities appealed to Marathi people all over the world to stay at home
Through the mimicry of celebrities appealed to Marathi people all over the world to stay at home
Updated on

कोल्हापूर - ग्रेट शोमन राज कपूर, गानकोकिळा लता मंगेशकर असोत किंवा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अशा तब्बल तीसहून अधिक सेलीब्रिटींनी कोल्हापूरकरांनाच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांना 'स्टे ऍट होम' असे आवाहन केले आहे. येथील बांधकाम व्यावसायिक आणि मिमिक्री आर्टिस्ट दिनेश माळी यांनी सलग तीस दिवस हा उपक्रम सुरू केला असून त्या त्या सेलीब्रिटींच्या आवाजातून त्यांनी हे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

अशोक कुमार, अमिताभ बच्चन, देवानंद, दिलीप कुमार, संजीव कुमार, राज कुमार, शशी कपूर, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, जगदीप, असराणी, ए. के. हनगल, ओमप्रकाश, शत्रुघ्न सिन्हा, प्रेम चोप्रा, अजित, प्राण, राजेश खन्ना, शक्ती कपूर, धर्मेंद्र, नाना पाटेकर, मनोज कुमार, के. एल. सैगल, अनिल कपूर, जॉनी वॉकर, पृथ्वीराज कपूर आदींच्या आवाजात विविध चित्रपटातील डॉयलॉग्जचा आधार घेत श्री. माळी यांनी हे व्हिडिओ तयार केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सर्वत्र शेअर केले. ते सांगतात, ""पंचवीस ते तीस वर्षापूर्वी कॉलेजचं गॅदरिंग आणि माझी मिमिक्री हे एक समीकरणच होते. पण, पुढे व्यवसायात आल्यानंतर ही कला मागेच पडली. पण, गेल्या चार वर्षापासून व्यवसायातून थोडा वेळ काढून मी या कलेत पुन्हा रमलो आहे. लॉकडाऊनच्या काळात सलग तीस दिवस प्रबोधनात्मक तीस मिमिक्री शेअर केल्या आहेत. अजूनही पुढचा प्रवास सुरूच राहणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com