
पीडित मुलगी ही सकाळी शाळेला निघाली असता संशयित तरुणाने तिचा मोटारसायकलवरून पाठलाग केला
मिरज - भावास मारहाण करण्याची धमकी देऊन शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 21 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. फरहान युसुफ ढालाईत (वय 21) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घटनेतील पीडित मुलगी ही सकाळी शाळेला निघाली असता संशयित तरुणाने तिचा मोटारसायकलवरून पाठलाग केला. तिला सक्तीने गाडीवर बसण्यास भाग पाडले.
हे पण वाचा - Good News: ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, गड पर्यटकांसाठी खुले; लॉकडाऊनमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत वाढ
तिला शहरातील एका हॉटेलच्या पिछाडीस असलेल्या खोलीत नेऊन तिला तुझ्या भावाला ठार मारेन अशी धमकी दिली. तिथेच तिला प्यायला पाणी दिले. हे पाणी प्यायल्यानंतर तिला कापडाच्या पट्टीने बांधण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार संबंधित मुलीने शहर पोलिसांत दिली आहे. पीडित मुलीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी केवळ काही मिनिटांत संशयित तरुणास अटक केली. दरम्यान, या घटनेबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाण्याच्या आवारात पीडित तरुणी आणि संशयित तरुणाच्या बाजूच्या नातेवाईक आणि अन्य मंडळींची गर्दी झाली होती.
संपादन - धनाजी सुर्वे