बेडअभावी उपचार  थांबवू नयेत ; राजेश क्षीरसागर

 Treatment should not be stopped due to lack of beds; Rajesh Kshirsagar
Treatment should not be stopped due to lack of beds; Rajesh Kshirsagar
Updated on

कोल्हापूर  : बेड नाहीत म्हणून शहरातील कोणताही रुग्ण उपचारांपासून दूर ठेवू नका, प्रसंगी खासगी रुग्णालये, तेथील डॉक्‍टरांची मदत घ्या, पण एकही रुग्ण उपचारापासून परत जाऊ नये, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अधिकारी राजेश क्षीरसागर यांनी आज सीपीआर रुग्णालयात झालेल्या बैठकीत आरोग्य यंत्रणेला दिल्या. 
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सीपीआरमध्ये बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या गांधीनगरातील वृद्ध व्यक्तीचा सीपीआरमध्ये बेड न मिळाल्याने मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर श्री. क्षीरसागर यांनी सीपीआरमध्ये वैद्यकीय अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह खासगी डॉक्‍टरांची बैठक घेतली.' 
ते म्हणाले, ""महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोणती रुग्णालय कोरोनावर उपचार करतात व कोणतेही उपचार करीत नाही. त्यांची माहिती घ्यावी तसेच संबंधित रुग्णालयांची बैठक घ्यावी, तसेच ज्या रुग्णालयांना जनआरोग्य योजनेतून मंजूर होणाऱ्या पॅकेजची माहिती जाहीर करावी.'' 
प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे म्हणाल्या, "" बेडअभावी दगावलेल्या रुग्णांच्या मृत्यूची चौकशी केली जाईल. होमक्वारंटाईनचे बनावट शिक्के मारणाऱ्यांची चौकशी होईल. कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. कोणत्याही रुग्णालयात बेड शिल्लक आहेत. कुठे सक्षम उपचार मिळू शकतात. याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकारी नियुक्त केला आहे.'' 
जिल्ह्यात 4 हजार 500 बेडची व्यवस्था केली आहे. उपचार सेवाही सक्षम करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. कॅम्पीपाटील यांनी दिली. 

बनावट शिक्के 
मारणाऱ्यांची चौकशी करा 

श्री. क्षीरसागर म्हणाले, ""कोरोना गंभीर अवस्थेतील रुग्णाला सीपीआरमध्ये आल्यानंतर बेड शिल्लक नाहीत, म्हणून सांगणे चुकीचे होईल, त्यासाठी अन्यत्र बेडची व वैद्यकीय उपचाराची सुविधा सक्षम करणे अपेक्षित आहे. यापुढे असे घडू नये याची काळजी घ्यावी. बाहेरगावावरून आलेल्यांना होमक्वारंटईनचे बनावट शिक्के मारण्याचा प्रकार येथे घडतो आहे. त्याचीही चौकशी करावी.''  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com