
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा होणार आहे. मात्र, तरीही मूर्तीकारांनी चार फूटांपर्यंतच्या मूर्तीमध्येही अँटीक मूर्तींची परंपरा जपली आहे. "कोरोनाचा वध करणारा बाप्पा' या रूपातील मूर्तींना मागणी असली तरी त्याचबरोबर बालगणेशाच्या विविध रूपातील मूर्तींनाही मोठी मागणी आहे. दरम्यान, येथील मूर्तीकार आशिष पाडळकरने यंदाही अँटीक मूर्ती साकारल्या असून त्याच्याकडील 20 मूर्ती हैद्राबादला रवाना झाल्या आहेत.
मंडळांबरोबरच घरगुती गणेशोत्सवातही आता थीमनुसार उत्सव साजरा करण्याचा ट्रेंड वाढतो आहे. एका विशिष्ट थीमनुसार किंबहुना एखाद्या पौराणिक कथेवर आधारित सजावट आणि त्याला अनुसरून मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा हा ट्रेंड आहे. त्यासाठी सजावटीपासून ते विविध तांत्रिक बाबींसाठी सारे कुटुंब पंधरा दिवस व्यस्त असते. सहकुटुंब सेलीब्रेशनची ही क्रेझ यंदाही कायम आहे. बाप्पांच्या सहवासातून सकारात्मक विचारांची पेरणी करून कोरोनावर मात करण्यासाठी सारी मंडळी सज्ज झाली आहेत. ज्यावेळी थीमनुसार उत्सवाची आखणी होते त्यावेळी त्या त्या थीमनुसार विविध रूपातील मूर्तींचीही मागणी असते. शंकर, रामाच्या रूपाबरोबरच उंदीर, मयुरारूढ, अंबारातील श्री गणेश आदी रूपांनाही यंदा मागणी आहे.
बाप्पांना पेहराव अन् फेटाही...!
घरगुती बाप्पांच्या मूर्ती सव्वा फूटापासून ते अगदी अडीच ते तीन फूटांपर्यंत असतात. या मूर्तींनाही आता विविध वेशभूषा आणि फेट्यांची यंदा क्रेझ आहे. वेशभूषा आणि फेट्यांची सुविधा देणाऱ्या तरूणाईचे प्रमाणही वाढले असून सध्याच्या कोरोनाच्या काळात त्यांच्यासाठी रोजगाराची ही नवी संधी निर्माण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून आपला हा छोटेखानी व्यवसाय अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे.
अँटीक मूर्तींना यंदाही मागणी असून नुकत्याच चार फूटांच्या 20 मूर्ती आम्ही हैद्राबादला पाठवल्या. विविध रूपातील मूर्तींमध्येही बालगणेशाच्या रूपांना यंदाही मागणी कायम आहे.
- आशिष पाडळकर, ऋणमुक्तेश्वर आर्टस्
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.