अंजली-राणादा कोल्हापुरात पुन्हा करणार धमाल

tujhyat jeev rangala serial shooting will be start in kolhapur
tujhyat jeev rangala serial shooting will be start in kolhapur

कोल्हापूर - कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करत येथे विविध मालिका आणि वेब सिरीजच्या शुटींगला लवकरच पुन्हा प्रारंभ होणार आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या शूटिंगने त्याचा श्रीगणेशा होणार आहे.


दरम्यान, मुंबई, पुणे येथून कोल्हापुरात शुटींगला येण्यासाठी सोळाहून अधिक प्रोजेक्‍टचे निर्माते तयार आहेत. त्यांच्यासाठी विशेष नियमावली तयार केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकूणच मनोरंजन क्षेत्राची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कलाकार व तंत्रज्ञांचे गेली दोन महिने प्रयत्न सुरू होते. त्याला सकाळ'ने पाठबळ देत सर्व घटकांना झूम मीटिंग ॲपच्या माध्यमातून  एकत्र आणून सविस्तर चर्चा घडवून आणली होती. कोल्हापुरात लवकरात लवकर शूटिंग सुरू व्हावीत, अशी स्पष्ट भूमिका 'सकाळ'ने घेतली.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील हार्दिक जोशी, अक्षया देवधर यांच्यासह कलाकार कोल्हापुरात दाखल झाले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सर्व कलाकार व तंत्रज्ञाचे इन्शुरन्स उतरवण्यात आले आहेत. केर्ली (ता. करवीर) येथे शूटिंगला प्रारंभ होणार असून तत्पूर्वी माॅक शूट केले जाणार आहे. 22 जून पासून ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com