बारावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात 

Twelfth result in the first week of July
Twelfth result in the first week of July
Updated on

कोल्हापूर : तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अनिश्‍चिततेच्या सावटात सापडलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात जाहीर करण्याच्या दृष्टीने तयारी झाल्याचे समजते. बारावीच्या परीक्षा लॉकडाऊन पुर्वी झाली मात्र निकालाची प्रक्रिया याच कारणामुळे पुढे गेली. 

राज्य मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच बारावी तसेच दहावीच्या निकालाबाबत विचित्र अशी स्थिती निर्माण झाली आहे. दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द झाला नंतर या विषयाला सरासरीइतके गुण देण्याचा निर्णय झाला. मुंबई, पुणे, नागपूर रेडझोनमध्ये गेल्यानंतर निकासाची प्रक्रियाची लांबणीवर पडली.

कोल्हापूर विभागीय मंडळाच्या अतंर्गत कोल्हापूरसह, सांगली तसेच सातारा जिल्ह्याचा समावेश होतो. तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डापर्यंत मुश्‍कील बनले. राज्यातील नऊही विभागीय मंडळाचा निकाल एकावेळी जाहीर होते. कोल्हापूर बोर्डाचे बारावीचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. अन्य बोर्डातही बारावीच्या निकालाबाबत फारशी अडचण दिसत नाही. त्यामुळे हा निकाल पंधरा जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नंतर दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाची पावले पडतील. 

दृष्टिक्षेप 
- तीन महिने अनिश्‍चिततेचे वातावरण 
- ऑनलाईन निकाल जाहीर होण्याची तयारी 
- भुगोलाच्या पेपरला सरासरी गुण देण्याचा निर्णय 
- मुंबई, पुणे, नागपूर रेडझोनमध्ये गेल्याने निकाल लांबणीवर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri’s 1,160 Km Journey From Vantara to Kolhapur
Madhuri Elephant Nandani Math Return
Dahi Handi Govinda death in Shirol
Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
Marathi News Esakal
www.esakal.com