कोल्हापूर जिल्ह्यातील 'हे' 24 बंधारे पाण्याखाली ; राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग

Twenty four dams under water in Kolhapur district
Twenty four dams under water in Kolhapur district

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरणात 130.70 दलघमी पाणीसाठा असुन सकाळी आलेल्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड, वारणा नदीवरील चिंचोली, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे आणि  खडक कोगे, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव व ऐनापूर, ताम्रपर्णी नदीवरील कुतनवाडी व चंदगड, दुधगंगा नदीवरील दत्तवाड व सिध्दनेर्ली असे एकूण 24 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 40.99 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 84.463 इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा पुढीलप्रमाणे...

तुळशी 47.17 दलघमी, वारणा 503.39 दलघमी, दूधगंगा 401.06 दलघमी, कासारी 40.93 दलघमी, कडवी 33.65 दलघमी, कुंभी 42.24 दलघमी, पाटगाव 62.32 दलघमी, चिकोत्रा 19.41 दलघमी, चित्री 20.46 दलघमी, जंगमहट्टी 16.20 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे...

राजाराम 26.8 फूट, सुर्वे 25.4 फूट, रुई 55.6 फूट, इचलकरंजी 52.6 फूट, तेरवाड 47.6 फूट, शिरोळ 37 फूट, नृसिंहवाडी 35 फूट, राजापूर 24.6 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 12.10 फूट अशी आहे.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com