या 47 जणांची बर्थ डे धमाल आता चार वर्षा नंतरच...

On twenty nine February forty seven children were born in kolhapur city
On twenty nine February forty seven children were born in kolhapur city

कोल्हापूर - चार वर्षांतून एकदा फेब्रुवारीत लिप वर्ष म्हणून २९ तारीख येते. याच विशेष दिवशी मुलांचा जन्म ही विशेष आनंदाची बाब मानली जाते. अशा दिनी आज शहरात रात्री बारा ते सायंकाळी ८ पर्यंत महापालिका व सीपीआर रुग्णालयात १७ बालकांचा जन्म झाला आहे. खासगी रुग्णालयात जवळपास ३० बालकांचा जन्म झाला असल्याने बालकांचा वाढदिवस चार वर्षांतून एकदा येणार आहे.

अनेकांना  वाटले विशेष कौतुक

शहरातील कोणत्याही खासगी रुग्णालयात बाल जन्माला आले तर त्याची नोंद तत्काळ एकत्रितपणे एकाच दिवशी होत नाही. अशा स्थितीत शासकीय रुग्णालयात मात्र मिळालेल्या नोंदीनुसार सावित्रीबाई फुले रुग्णालयात सायंकाळी सहापर्यंत पाच बाळांचा जन्म झाला होता. यात तीन मुली होत्या. सीपीआरमध्ये बारा बालकांचा जन्म झाला. यात ७ मुली होत्या. सायंकाळी ६ ते रात्री बारापर्यंत अजूनही पाच बालकांचा जन्माला येतील असा अंदाज सीपीआरमधील वैद्यकीय सूत्रांनी दिला.
लिप वर्ष हे चार वर्षातून एकदा येत असल्याने या विशेष दिवशी बाळाचा जन्म  व्हावा, अशी अपेक्षा काही दांपत्यांची किंवा अन्य नातेवाइकांची इच्छा असते. काहींची कोणतीही अपेक्षा न बाळगता नैसर्गिकरीत्या जेव्हा बाळाचा जन्म व्हायचा तेव्हा व्हावा, असेही मानतात, तरीही लिप महिन्यात २९ तारखेला बाळाचा जन्म झाल्याने अनेकांना विशेष कौतुक वाटले, अशी माहिती सीपीआर वैद्यकीय सूत्रांनी दिली. ठराविक दिवसांचा आग्रह कमी सणादिवशी किंवा नवीन वर्षादिवशी तसेच पंचांगांनुसार विशिष्ट दिवशी बाळाचा जन्म व्हावा, अशी अनेकांची अपेक्षा असते. नैसर्गिकरीत्या प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर बाळंतपण करावे लागते. त्यासाठी दिवस पूर्ण व्हावे लागतात. याबाबत डॉक्‍टरांकडून जागृती केली जात असल्याने ठराविक दिवशीच बाळाचा जन्म व्हावा, अशी अपेक्षा आता कमी झाली आहे. त्यातूनही ज्यांना योगायोगाने आजच्या तारखेला बाळाचा जन्म झाला त्यांना मात्र विशेष आनंद व कुतहूल आहे.  

विशेष अप्रुप

आज जन्मलेल्या बाळांचा वाढदिवस चार वर्षांतून एकदा येणार आहे. यापूर्वी ज्यांचा जन्म २९ फेब्रुवारीला झाला ते चार वर्षांतून एकदा धुमधडाक्‍यात वाढदिवस साजरा केला. शाळा, कॉलेज सहविविध कार्यालयात अशा व्यक्तींना शुभेच्छा देण्यात आल्या त्याच्या सेल्फीच्या छबी सोशल मीडियावर दिवसभर झळकत राहिल्या.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com