esakal | कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

shivam Bodhe

प्रयाग चिखली, वडणगे, वरणगे-पाडळी येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसाने हैराण केले आहे. यातच आजपासून (ता. 18) पासून दोन दिवस मूसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पंचगंगा, वारणा, दूधगंगा व घटप्रभा खोऱ्यातील नद्यांची पूर परिस्थिती कायम राहणार आहे. पंचगंगा नदीने सोमवारी इशारा पातळी गाठली. रात्री साडेअकराच्या दरम्यान पाणी पातळी 39.2 फूट इतकी होती. 

दरम्यान, प्रयाग चिखली, वडणगे, वरणगे-पाडळी येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु झाले आहे. आज एनडीआरएफच्या पथकाने या गावातील रहिवासियांना सोनतळी येथे स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले. प्रयाग चिखली, वरणगे-पाडळी गावातील 30 टक्के लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चार गावांमधील 1709 व्यक्तींचे व 365 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. चिखलीतील 895 व्यक्ती व 237 जनावरे, आंबेवाडीतील 615 व्यक्ती व 112, चंदगडमधील एक गावातील 45 कुटुंबातील 184 व्यक्तींसह 16 जनावरे, महापालिका क्षेत्रातील आठ कुटूंबातील 15 नागरिकांचे स्थलांतरीत केले आहे. शहरातील एका संक्रमण शिबिरात 5 पुरुष, 9 महिला तर 1 लहान मुलगा आहे. 

 95 बंधारे पाण्याखाली

 • पंचगंगा- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. 
 • भोगावती- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, तारळे, व शिरगाव. 
 • तुळशी - बीड, आरे, बाचणी, व घुंगुरवाडी 
 • कासारी- यवलुज, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे, कांटे, कुंभेवाडी, करंजफेण व पेंडाखळे 
 • कुंभी- सांगरुळ, कळे, शेणवडे व मांडुकली 
 • धामणी - सुळे, आंबर्डे, पनोरे, गवशी व म्हासुर्ली 
 • वारणा -चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची, मांगले-सावर्डे, शिगाव, चावरे व दानोळी 
 • कडवी - सवतेसावर्डे, शिरगांव, सरूड पाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर,कोपार्डे, सुतारवाडी 
 • दुधगंगा- सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, सुळंबी, तुरंबे व वाळवे 
 • वेदगंगा- कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, शेळोली, शेणगाव व करडवाडी 
 • हिरण्यकेशी- निलजी, गिजवणे, ऐनापूर, खणदाळ, हरळी, जरळी, दाभीळ, देवर्डे, साळगाव, चांदेवाडी, भादवण व गजरगांव 
 • घटप्रभा - कानडे-सावर्डे, आडकूर, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगाव, तारेवाडी व कानडेवाडी 
 • ताम्रपर्णी - कुर्तनवाडी, चंदगड, कोकरे, कोवाड, हल्लारवाडी, माणगाव, उमगाव व न्हावेली

संपादन ः विजय वेदपाठक