पाटणे येथे पहाटेच्या सुमारास दोन गवे अचानक पडले विहिरीत...

 two gaur suddenly fell into the well
two gaur suddenly fell into the well
Updated on

कोल्हापूर - पाटणे ता.चंदगड येथे पहाटेच्या सुमारास दोन गवे अचानक विहिरीत पडले. यातील एक गवा कसाबसा विहिरीबाहेर येऊन जंगलात पळून गेला तर दुसऱ्या गव्याला वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांना जीवदान देण्यात यश आले. जवळपास दिड दोन तास प्रयत्नांची शर्थ करीत या गव्याला जीवदान मिळाले.            

याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की पाटणे येथील जंगल हद्दीलगत अण्णाप्पा गोंडे यांची खासगी जमीन आहे तेथे विहीर आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला त्यानुसार पहाटेच अंदाज घेण्यात आला. तेव्हा दोन गवे विहिरीत पडल्याचे दिसून आले. काही वेळातच यातील एक गवा विहिरीच्या काठावरून कसाबसा बाहेर आला व त्याने जंगलाकडे धूम ठोकली दुसरा गवा विहीरीतच अडकून पडला होता. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या पाटणे क्षेत्राचे वनपाल दत्ता पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची पाहणी केली तातडीने जेसीबी मागवला. काही ग्रामस्थ ही मदतीला धावले आणि विहीर एका बाजूने जेसीबीच्या सह्याने खोदकाम केले.तशी विहिरीत अडकलेल्या गव्याला विहिरी बाहेर येण्यास जागा मिळाली तोपर्यंत हिरवेगार गवत विहिरीत टाकून गवा बुडणार नाही याची दक्षता घेण्यात आली.

जवळपास दीड-दोन तासात विहिरीचे खोदकाम पूर्ण होताच त्या खोदकामाचा आधार घेत गवा विहिरीबाहेर आला. स्वतःला सावरत तच विहिरी लगत असलेल्या एका भरावा वर चढला. तिथून त्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. या कारवाईत वनपाल दत्ता पाटील, बी. आर. भांडकोळी, जे.पी. वळवी, डी.एम. बडे, मोहन तुपारी यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

उन्हाळ्याचे दिवस आहेत.जंगली प्राणी काही वेळेला अवतीभोवतीच्या शेतात येऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच रस्त्यावरून जाणा-या येणारे लोकांना ही काळजी घेणे व वन्यजीव आला कोणतीही इजा होणार नाही यासाठी सतर्क राहणे तसेच जंगलात वणवे लागणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

दत्ता पाटील - वनपाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com