कांदा उत्पादक संतप्त : कोल्हापुरात शेतकरी करणार शुक्रवारी आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

मार्केट यार्डात दोन तास सौदे बंद; चर्चेनंतर पुन्हा सौदे

कोल्हापूर : कांद्याची आवक वाढली असताना अचानक दर कमी झाल्याने शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कांदा सौदे बंद पडले. शेतकरी-व्यापारी यांच्यात खडाजंगी झाली. अखेर बाजार समितीने मध्यस्थी केल्यानंतर सौदे पुन्हा सुरू झाले.
सकाळच्या सत्रातील सौद्यात दर ८० रुपये तर प्रथम श्रेणी कांद्याचे दर २०० रुपयेपेक्षा कमी आले. त्यामुळे कांदा उत्पादकांनी 
आक्षेप घेतला.

 
कांद्याचे दर वाढवून पाहिजेत, अशी मागणी केली. तेव्हा काही व्यापाऱ्यांनी आमच्याकडूनही कांद्याची मागणी नसल्याने जास्त दर देता येणे अवघड असल्याचे सांगितले. यावरून शेतकरी संतप्त झाले. अनेक शेतकऱ्यांनी दोनशे रुपयांच्या पुढे दर देत असाल, तरच सौदे काढा, अशी भूमिका घेतली. तेव्हा व्यापाऱ्यांनी सौदे थांबवले. बाजार समितीचे सचिव मोहन सालपे व उपसचिव जयवंत पाटील यांनी कोल्हापूरचे कांदा दर तसेच अन्य जिल्ह्यातील दर एक सारखेचे असल्याचे दिसून आले. त्यानंतर श्री. पाटील व श्री सालपे यांनी शेतकऱ्यांनी ही बाब पटवून दिली. तसेच अडत्यांनी जादा दर देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. 

हेही वाचा- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षण :  कोल्हापुरात दिवसभरात २६ जणांना कोरोना, ५ रुग्ण सारीचे -

सर्वाधिक दर कोल्हापुरात
आज सौदे निघाले यात १० किलोसाठी कमीत कमी दर १०० रुपये तर जास्ती जास्त दर ४२० तर सरासरी दर २६० रुपये मिळाला. राज्यातील  सर्वाधिक दर आज कोल्हापुरात आलेल्या कांद्याला मिळाला आहे.

 

शेतकऱ्यांचे उद्या आंदोलन 
शेतकरी हिताच्या विरोधात केलेले नवे कायदे तसेच शेतकी अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या विविध संघटनांतर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या शुक्रवारी (ता. २५) अखिल भारतीय किसान सभा व शेतकरी संघटनांतर्फे येथील बिंदू चौकात निदर्शने होणार आहेत. अशी माहिती किसान सभेतर्फे देण्यात आली. 

शेतकऱ्यांच्या शेतीमाल योग्य भाव मिळत नाही. बाजारपेठेत व्यापारी कंपन्या नाममात्र दरात शेतीमालांची खरेदी करतात, ज्यादा भावात ग्राहकाला विकून नफा कमवतात अशात शेतकऱ्यांचे नुकसान होते अस असताना केंद्र सरकारने नवीन कायदे केले यात यात शेतीमालाची सरकारी खरेदी बंद होणार आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two hour onion deals closed in kolhapur market yard Deals again after discussion