कोल्हापुरात आजही दोनशेचा टप्पा पार ; आठ जणांचा मृत्यू

two hundred new corona positive case found in kolhapur district
two hundred new corona positive case found in kolhapur district
Updated on

कोल्हापूर - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रोजच कोरोना रूग्णांच्या संखेत वाढ होत आहे. ही वाढ सुरूच असून आज सायंकाळपर्यंत १९८ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार २७० झाली आहे. तर बऱ्या झालेल्या रूग्णांची संख्या आता एक हजार ८३ झाली आहे. एकूण एक हजार ९१५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

आज पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये कसबा बावडा, कोल्हापूर शहर, शिये, जयसिंगपूर, कोतोली, कागल, चंदगड, शाहुवाडी, भुदरगड, करवीर, शिरोळ, पन्हाळा, गडहिंग्जल, हातकणंगले येथील रूग्णांचा समावेश आहे. 

आठ जणांचा मृत्यू

काल दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज आणखी आठ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बाबड्यातील एका कोरोनाबाधिताचा समावेश आहे. 

दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सीपीआर रूग्णालय, तसेच शहरातील चार खासगी रूग्णालये हाऊसफुल्ल होत आहेत. तरीही तेथे नेटाने कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत मात्र नव्या रूग्ण वाढल्यास बेड शिल्लक राहणे मुश्‍कील आहे. अशा स्थितीतून शासकीय वैद्यकीय यंत्रणेवर कमालीचा ताण येत आहेत. अशा स्थितीत पर्यायी व्यवस्थांचा शोध सुरू झाला आहे. 

शाब्बास कोल्हापूरकर, घरीच रहा सुरक्षित रहा 

कोल्हापूर शहर "हॉटस्पॉट' होत असतानाच कोल्हापूरकरांनी लॉकडाउनला प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे शाब्बास कोल्हापूरकर असे म्हणण्याची वेळ आली आहे. शंभर टक्के लॉकडाउनचा आजचा चौथा दिवस आहे. पोलिसांना कारवाई करण्यासाठी रस्त्यावर वाहन मिळत नसल्याची स्थिती शहरात आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com