घटत्या रुग्णसंख्येमुळे कोल्हापुरातील दोन कोविड सेंटर बंद, आरोग्य यंत्रणेवरचा ताण हलका

०
Updated on

कोल्हापूर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत असल्याने शिवाजी विद्यापीठातील दोन्ही कोरोना केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणच्या कोरोना केअर सेंटरमध्ये आता बेडची संख्या उपलब्ध आहे. रुग्णालयातील बेडची संख्याही उपलब्ध असल्याचे महापालिकेतून सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णांना आता बेड मिळणे सहज सोपे होत आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत 287 ने भर पडली. एकूण बाधितांची संख्या 46 हजारांवर गेली आहे. जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट आहे. रुग्णसंख्या कमी येत असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. 

जिल्ह्यात गत दोन महिन्यांत कोरोनाने कहर केला होता. आता मात्र रुग्णसंख्या घटत आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. दिवसभरात आजरा तालुक्‍यात तीन, भुदरगड 18, चंदगड नऊ, गडहिंग्लज सहा, हातकणंगले 39, कागल चार, करवीर 39, करवीर 26, पन्हाळा सहा, राधानगरी चार, शाहूवाडी तीन, तर शिरोळ तालुक्‍यात 14 रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूर शहरात आज नव्या 75 रुग्णांची वाढ झाली. एकूण बाधित 46 हजार 15 रुग्ण आहेत. पैकी 37 हजार 293 कोरोनामुक्त झाले. आजअखेर एक हजार 502 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

नवरात्रोत्सव, दसरा साधेपणाने साजरा करावा 
जिल्ह्यामध्ये सध्या कमी होणारी कोरोनाबाधितांची पुन्हा वाढू नये, यासाठी नागरिकांनी गर्दी न करता सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझर यांचा वापर करून नवरात्रोत्सव आणि दसरा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. 

शासनाच्या निर्देशानुसार अनलॉक सुरू आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, ""अनलॉकमुळे नागरिकांचे व्यवहार सुरू झाले आहेत. सध्या 200 ते 300 बाधित 
सापडत आहेत. 17 ऑक्‍टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या पुन्हा वाढणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी सामाजिक अंतराचा वापर, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि गर्दी टाळून हे उत्सव साधेपणाने साजरे करावेत.'' दसरा चौकात साजरा होणाऱ्या पारंपरिक उत्सवासाठीही कमीत कमी गर्दी करावी. तसेच नियमांचा वापर करावा जेणेकरून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार नाही याची सर्वांनीच दक्षता घ्यावी. 

संपादन : विजय वेदपाठक
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com