esakal | धक्कादायक : दहावीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन ; कर्नाटक राज्यात खळबळ...
sakal

बोलून बातमी शोधा

two students appearing for the examination corona positive

शनिवारी गणीत विषयाचा पेपर दिलेल्या हासन जिल्हातील 16 वर्षीय विद्यार्थ्याला कोरानाची लागन झाली आहे.

धक्कादायक : दहावीची परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन ; कर्नाटक राज्यात खळबळ...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव - दहावीच्या परीक्षेला सुरळीतरित्या सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात परीक्षा देत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना कोरानाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षण खात्याची चिंता वाढली असुन बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह इतर ठिकाणीही आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच उर्वरीत चार पेपरवेळी विद्यार्थी व पालकांनी सामाजिक अंतर राखणे आवश्‍यक बनले आहे.

हासन येथील विद्यार्थ्याच्या संपर्कात 39 विद्यार्थी

शनिवारी गणीत विषयाचा पेपर दिलेल्या हासन जिल्हातील 16 वर्षीय विद्यार्थ्याला कोरानाची लागन झाली आहे. परीक्षेच्या अगोदर त्या विद्यार्थ्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. पेपर झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे कोरोना रुग्ण सापडलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर गदग येथे दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर दिलेला विद्यार्थीही कोरोना पॉझिटिव्ह आला असुन त्यांच्या प्रथम व व्दितीय संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे. तर हासन येथील विद्यार्थ्याच्या संपर्कात 39 विद्यार्थी आल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिक्षण खात्याने आता परीक्षा केंद्राबाबत अधिक सजग राहणे आवश्‍यक आहे.

वाचा - शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश ;  या शिक्षकांना मिळणार वर्क फ्रॉम होमच....

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर दहावीची परीक्षा होत असल्याने शिक्षण खात्याने सर्व परीक्षा केंद्रावर निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. तसेच केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सॅनिटायजर्स दिले जात आहे. तरीही अनेक परीक्षा केंद्रावर विद्यार्थी गर्दी करीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणारे पालकही सामाजिक अंतर राखत नसल्याने चिंता व्यक्‍त होत असुन राज्यात परीक्षा देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांनी उर्वरीत पेपरवेळी काळजी घेणे आवश्‍यक आहे.

वाचा - महाराष्ट्रातून कर्नाटकात जायचे आहे असा आहे नियम वाचा....

सोमवार (ता. 29) रोजी दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वत: हुन सामाजिक अंतर राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्‍त होत असुन विद्यार्थ्यांनी इतर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष न देता परीक्षा द्यावी असे आवाहन शिक्षण खात्याने केले आहे.

go to top