धक्कादायक : आता त्यांची परिक्षा होती, घरचे म्हणाले अभ्यास करा... पण त्यांनी उचलले 'हे' टोकाचे पाऊल...

Two students of ssc ended their life belgum
Two students of ssc ended their life belgum

बेळगाव - दहावीची परीक्षा जवळ आलेली असतानाच दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने पालकांची चिंता वाढली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या ही चिंतेची बाब ठरली असुन विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे गरजेचे बनले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे यावेळी दहावीची परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. मात्र शिक्षण खात्याने परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात गुंतले आहेत मात्र पालकांनी अभ्यास करा असे सांगितल्याने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे अनेक पालक घाबरुन गेले आहेत. मार्च महिन्यात दहावीची परीक्षा होणार होती मात्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने परीक्षा अडीच महिने लांबणीवर पडली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी अभ्यासापासुन दुर गेले आहेत. त्यामुळे परीक्षा काही दिवसांवर आल्याने अभ्यास कर असे पालक आपल्या मुलांना सांगत आहेत. मात्र पालकांनी अभ्यास कर असे सांगितले म्हणुन आत्महत्या करणे चुकीचे असुन कोणत्याही विद्यार्थ्यांने अशी टोकाची भुमिका घेऊ नये तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना समजावुन सांगताना त्यांच्यावर अधिक प्रमाणात दबाब टाकु नये अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

गुरूवारी पंत बाळेकुंद्री येथील मौनेश रमेश सुतार याने पुढील आठवड्यात परीक्षा आहे. त्यासाठी वेळ न दवडता अभ्यास करून चांगले गुण घे असे सांगितल्याने मनाला लावून घेऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. तर बुधवारी दहावीची परीक्षा जवळ आली असुन मोबाईलवर वेळ घालवू नकोस. अभ्यासाकडे कर असे पालकांनी सांगितल्याचा राग मनात धरून मार्कंडेयनगर येथील युवराज शिवाजी बागिलगेकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे दोन दिवसात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा विषय ऐरणीवर आला असुन आत्महत्या टाळण्यासाठी समुपदेशन करणे काळाची गरज बनली आहे. 25 जुनपासुन दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करीत अभ्यास करणे आवश्‍यक असुन पालक व शिक्षकांनी केलेल्या सुचनांकडे विद्यार्थ्यानी लक्ष देणेही आवश्‍यक आहे.
 

विद्यार्थ्यांनी परीक्षेची भिती बाळगु नये यापुर्वीच विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे आत्मविश्‍वासाने परीक्षेला सामोरे जाण्याची आवश्‍यकता असुन पालकांनी समुपदेशकाची भुमिका बजावावी.
- ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com