बळ्ळारी नाला शेतकऱ्यांच्या मुळावर ; दोन हजारांहुन अधिक शेती पाण्याखाली 

 two thousand farms under water at  Ballari Nala belgum
two thousand farms under water at Ballari Nala belgum

बेळगाव - बळ्ळारी नाला वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, हलगा, अनगोळ, बेळगाव, बसवान कुडची, कणबगीं भागातील शेतक़ऱ्यांसाठी दुखणे ठरत आहेत. तरीही प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा कधीच ऐकल्या नाहीत त्यामुळे बळ्ळारी नाला शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. 

येळ्ळुर रोड येथुन बळ्ळारी नाल्याला सुरुवात होते. त्यानंतर हा नाला पुढे जाऊन मार्कंडेय नदीला मिळतो. मात्र वडगाव शिवार ते कणबर्गीपर्यत नाल्यावर मोठया प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे काही वर्षांपुर्वीचा नाला आणि आताचा नाला यामध्ये मोठा बदल झाला आहे. तसेच शिवारात रस्ते करताना चुकीच्या पध्दतीने पुल बांधण्यात आले आहेत. तसेच नाल्यात प्रचंड प्रमाणात वाढलेल्या जलपर्णीमुळे बळ्ळारी नाल्यातील पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नाही. त्यामुळे पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. 

गेल्या दोन दिवसापासुन नाल्याला आलेल्या पुरामुळे वडगाव ते कणबर्गीपर्यंतची शेत जमीन मोठ्‌या प्रमाणात पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शिवारात नुसते पाणीच पाणीच दिसुन येत असुन दोन एकरांहुन अधिक जमिन पाण्याखाली गेली असुन वेळेत पाणी कमी न झाल्यास शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरवेळी पिकांचे नुकसान झाल्यानंतर प्रशासनाकडुन पिक नुकसानीचा सर्व्हे केला जातो. मात्र शेतकऱ्यांना दरवेळी मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. 
 

नालाच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी आता ठोस भुमिका घेणे आवश्‍यक आहे. तरच शेतकऱ्यांचे दरवर्षी होणारे नुकसान टळणार आहे. अन्यथा दरवषीं भात पेरणी केल्यानंतर पुराचा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नाल्याचा विकास करण्यासाठी येणाऱ्या काळात प्रशासनाला भाग पाडावे लागेल 
- आप्पाजी हलगेकर, शेतकरी 
 

अनेक वर्षांपासुन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तरीही प्रशासनाने बळ्ळारी नाल्याच्या विकासाकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नाल्याला पुर येत आहे. सध्या पिकांत शिरलेले पाणी लवकर कमी न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.  - शांताराम चव्हाण पाटील, शेतकरी

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com