उजळाईवाडी वासीयांच ठरलं; यंदा बसवणार "एक गाव, एक गणपती'

In Ujlaiwadi to build "One Village, One Ganpati"
In Ujlaiwadi to build "One Village, One Ganpati"
Updated on

उजळाईवाडी : येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत "एक गाव एक गणपती' बसविण्याचा निर्णय सुर्वानुमते घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुवर्णा माने होत्या. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण उपस्थित होते. 

बैठकीमध्ये कोरोनाचा सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी सण-उत्सव जबाबदारीने साजरे करणे आवश्‍यक असून गणेशोत्सवामुळे संभाव्य गर्दी टाळून संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण गावात हनुमान मंदिरामध्ये एकच गणेश मूर्ती स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला सर्व मंडळानी सकारात्मक प्रतिसाद देत या वर्षी उजळाईवाडीमध्ये "एक गाव एक गणपती' उपक्रम राबविण्याचे ठरले. 

सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत चव्हाण, डी. जी. माने, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सचिन पाटील, राजू माने यांचे मनोगत झाले. एक गाव एक गणपती ही लोकचळवळ बनून उजळाईवाडी आदर्श निर्माण करेल, अशी संकल्पना मांडली.

उपसरपंच प्रकाश मेटकरी, तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन पाटील, अजय पाटील, चंद्रकांत पंडित, पोपट नाईक, तानाजी चव्हाण, राजाराम माने, राजेंद्र माने, संपत दळवी, लक्ष्मण केसरकर, नायकू बागणे, पोलीस पाटील विनायक भानुसे तसेच विविध तरुण मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक डी जी माने व आभार नायकू बागणे यांनी मानले. 

घरगुती व एक गाव एक गणपती एकाच दिवशी विसर्जित केला जाईल. प्रत्येकांनी घरीच गणेश मूर्ती विसर्जित केली तर सामूहिक संसर्ग होण्याला आळा बसेल. उजळाईवाडी ग्रामपंचायतीने एक गाव एक गणपती ही लोकचळवळ उभी करून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. 
- सुवर्णा माने, सरपंच, उजळाईवाडी 


ग्रामपंचायत व गावातील सर्व तरुण मंडळांनी एक गाव एक गणपती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांचे अभिनंदन. गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात 'एक गाव, एक गणपती' साजरा होण्यासाठी पुढाकार घेत आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विना परवाना गणपती बसवला तर त्या मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक, गोकूळ शिरगाव पोलीस ठाणे. 

दृष्टिक्षेप 
- उजळाईवाडी ग्रामपंचायतीतील बैठकीत सर्वानुमते निर्णय 
- सामुहिक संसर्ग टाळण्यासाठी एकच गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार 
- गावातील सर्व मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद 
- सर्व सण-उत्सव जबाबदारी जाणून साजरे केले जाणार 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com