बेळगाव तालुक्यात मामाने केला भाच्यावर गोळीबार

uncle tried to kill his niece by shooting in belgaum
uncle tried to kill his niece by shooting in belgaum

बेळगाव - खुल्या जागेच्या वादातून मामाने भाच्यावर गोळीबार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या पत्नीला देखील मारहाण केली. शनिवार (ता.8) आंबेवाडी (ता.बेळगाव) येथे दुपारी तीच्या सुमारास ही घटना घडली असून अमित बाबूराव पावले (वय 35), निता अमित पावले (वय 30 दोघेही रा. आंबेवाडी) अशी जखमी पती पत्नीची नावे आहेत. या प्रकरणी खाचू मोनिंग तरळे (वय 45), लक्ष्मी खाचू तरळे (वय 40, दोघेही रा. आंबेवाडी) यांच्या विरोधात टोपाण्णा गोपाळ ढोपे (वय 60, रा. शिवाजी गल्ली आंबेवाडी) यानी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. गोळीबार करुन संशयित फरारी झाला असून त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु आहेत. जखमीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, संशयित मारेकर खाचू याने भाचा अमितला मालमत्तेत योग्य वाटणी हिस्सा करुन न दिल्याने दोघांमध्ये खुल्या जागेवरुन गेल्या काही वर्षापासून वाद सुरु आहे. यापुर्वी देखील त्यांच्यात वादावादी होऊन प्रकरण हातघाईपर्यंत गेले होते. त्यामुळे यापुर्वी काकती पोलिसात दोन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वादग्रस्त जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आज दुपारी 3 च्या सुमारास अमित पत्नी नितासह वादग्रस्त जागेत थांबले होते. त्यावेळी खाचू त्या ठिकाणी गेला 'आमच्या जागेवर काय कारताय?' असे म्हणत अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अमितने 'आम्ही आमच्या जागेवर आहे.' असे म्हटल्यानंतर 'मला उलट बोलतोस तुला जीवानीशी सोडत नाही. तुझा ठार करतो' असे म्हणत आपल्याकडील सिंगल बॅरेलच्या बंदुकीने अमितवर गोळी झाडली. सदर गोळी अमितच्या खांद्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

 त्यानंतर जखमीची पत्नी निताला संशयिताची पत्नी लक्ष्मीने काठीने मारहाण करत अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. त्यानंतर संशयितानी घटनास्थळावरुन पलायन केले. घटना घडताच दोघांही जखमींना गावातील काहींनी एका खासगी मालवाहू टेंपोतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. फरारी संशयितांच्या अटकेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

संपादन - मतीन शेख
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com