पुतण्याने मोबाईल चोरल्याचा चुलत्याला आला संशंय... अन् त्यांने केला गोळीबार...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

बहिरेश्‍वरवाडी (ता. करवीर) विवेक विश्‍वास पडवळे हे कुटुंबासोबत राहतात. संशयित सुभाष पडवळे हे त्यांचे चुलत आहेत. त्याचा दोन दिवसापूर्व मोबाईल चोरील गेला होता. तो मोबाईल पुतण्या विवेक यांनी चोरल्याचा त्यांना संशय होता.

कोल्हापूर - बहिरेश्‍वर (ता. करवीर) येथे मोबाईल चोरल्याच्या संशयावरून चुलत्याने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता.23) घडला. याप्रकरणी संशयित सुभाष शंकर पडवळे (रा. बहिरेश्‍वर वाडी) याला करवीर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून बारा बोअरची बंदूक जप्त केली असल्याचे करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले. 

बहिरेश्‍वरवाडी (ता. करवीर) विवेक विश्‍वास पडवळे हे कुटुंबासोबत राहतात. संशयित सुभाष पडवळे हे त्यांचे चुलत आहेत. त्याचा दोन दिवसापूर्व मोबाईल चोरील गेला होता. तो मोबाईल पुतण्या विवेक यांनी चोरल्याचा त्यांना संशय होता. यातूनच सोमवारी (ता.23) सकाळी संशयित सुभाष हा त्याची परवाना असलेली बारा बोअरची बंदूक घेऊन विवेक यांच्याकडे आला. त्यावेळी मोबाईलवरून त्यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. यातच संशयित सुभाषने विवेकवर व हवेत गोळीबार करून दहशत माजवली. सुदैवाने विवेक यांना यात कोणतीही इजा झाली नाही. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली. घटनास्थळी करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दुपारी विवेक पडवळे यांनी थेट करवीर पोलिस ठाणे गाठून काका संशयित सुभाष पडवळेवर विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार सुभाषवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडील बंदूक जप्त केली. आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने एक दिवस कोठडी सुनावली. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण करीत आहेत. 

दरम्यान, सुभाष पडवळे याने सोमवारी (ता. 24) सकाळी मोबाईल मागितल्याच्या रागातून दोघा पुतण्यांनी कोयत्याने मारहाण केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार करवीर पोलिस ठाण्यात संशयित पुतणे विवेक ऊर्फ करण विश्‍वास पडवळे व वैभव विश्‍वास पडवळे (दोघे रा. बहिरेश्‍वर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The uncle's firing on suspicion of stealing mobiles has led to the shocking form of firing