कोरोनासह जगायची सवय लावायला हवी...

Unlock Phase One and Two is currently underway
Unlock Phase One and Two is currently underway
Updated on

कोल्हापूर - 'कोरोना'चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे. गेले सत्तर दिवस देशातील जनता या महामारीने भयभीत झालेली आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था व दळणवळण पूर्णतः ठप्प झाली आहे. या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 'अनलॉक फेज एक व दोन' सध्या सुरू झाली आहे.

हातावरचे पोट असलेल्या मजुरांना थोडासा दिलासा मिळत आहे. उद्योग व दळणवळण सेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. मुंबई-पुण्यातील रेड झोनमधील जनतेला प्रवासाची व उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली जात आहे. त्यामुळे शहरातील लोक आपापल्या गावी जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढत असलेला दिसून येत आहे. आता आपल्याला कोरोनासह जगण्याची सवय लावून घ्यायला हवी. कोरोना पेशंट दिसल्यास त्यावर मात करण्यासाठी पावले टाकायला हवीत. कोरोनाची लक्षणे दिसू लागताच त्यावर तातडीने उपचार झाल्यास रुग्ण दगावत नाही. ज्यांना आधीच दमा, मधुमेह, न्यूमोनिया अथवा फुप्फुसाचे आजार असतात अशा व्यक्तीने कोरोनात काळजी व योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. लहान मुलांना, तरुणांना शक्‍यतो वयाच्या 55 वर्षांच्या आतील व्यक्तींनी घाबरण्याचे कारण नाही.

आजपर्यंत ज्या व्यक्ती कोरानामुळे मृत झाल्या आहेत त्या कोणत्या ना कोणत्या आजाराने आधी त्रस्त झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. तोंडाला मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, अनावश्‍यक गर्दी टाळल्यास कोरोनापासून नक्की वाचता येईल.
- डॉ. पी. आर. पाटील, कोल्हापूर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Police System
Rajaram Puri Ganesh Procession
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
Kolhapur Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com