इचलकरंजी पालिकेत गदारोळ:  5 तास चाललेल्या सभेत वादळी चर्चा 

Unprecedented commotion in Ichalkaranji Municipality Stormy discussion meeting lasted for 5 hours political marathi news
Unprecedented commotion in Ichalkaranji Municipality Stormy discussion meeting lasted for 5 hours political marathi news

इचलकरंजी :  पालिकेच्या 437 कोटी रुपयांच्या वार्षिक अंदाजपत्रकास आज झालेल्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीने सुचविलेली सुमारे 32 कोटी 76 लाख रुपयांची पोकळ वाढ मागे घेण्याची विरोधकांनी केलेली मागणी 13 विरुध्द 29 मतांनी फेटाळण्यात आली. तर जागा आरक्षण रद्द करण्याच्या विषयांना सभागृहात अभूतपूर्व गोंधळानंतर मंजुरी देण्यात आली. येथील राजीव गांधी सांस्कृतीक भवनमध्ये तब्बल 5 तास चाललेल्या या सभेमध्ये अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या.


अंदापत्रक मंजुरीच्या विषयावरील चर्चेवेळी नगरसेवक शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे यांनी विविध प्रश्‍न उपस्थीत करीत प्रशासनाला कोंडीत पकडले. प्रशासनाने सुचविलेल्या 415 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीमध्ये केलेल्या 32 कोटी 76 लाखांच्या वाढीबाबत आक्षेप घेतला. अनेक बाबींवर जमेच्या बाजू पोकळ असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांवर प्रशासनाला उत्तर देता आले नाही. खोदाई शुल्क, कर उत्पनातील वाढ ही बोगस असल्याचेही सांगत अंदाजपत्रकांचा पंचनामाच केला. घनकचरा शुल्क व घरफाळा यामध्ये वाढ गृहीत धरण्यात आल्यामुळे जनतेवर करवाढीचा बोजा टाकण्याचीही शक्यता बावचकर यांनी चर्चेवेळी व्यक्त केली.

स्थायी समितीने वाढ केलेले 32 कोटी 76 लाख रुपये अंदाजपत्रकांतून कमी करण्याची मागणी करीत ठराव दाखल केला. त्यावर मतदान होवून 13 विरुध्द 29 मतांनी हा ठराव नामंजूर करण्यात आला. तिघेजण तटस्थ राहिले. अखेर मतदानांने 437 कोटी 32 लाखांचे वार्षिक जमा खर्चाचे तर 85 कोटी 67 लाखाच्या शिलकी अंदाजपत्रकास वादळी चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली.


 जागा आरक्षण रद्दचे तब्बल 53 विषय तिसर्‍यांदा आज चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. मात्र सत्तेत असलेल्या आवाडे समर्थकांसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुढील सभेसमोर हे विषय पून्हा आणावेत, अशी मागणी केली. पण सत्तेतील भाजप- शाहू आघाडीसह विरोधकांनीही हे विषय मंजूर करण्याची भूमिका घेतली. यावेळी नगरसेवक मदन कारंडे व सुनिल पाटील यांच्यात प्रचंड शाब्दीक वाक्युध्द रंगल्यांने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला. नंतर मात्र आमदार प्रकाश आवाडे यांच्या सूचनेनुसार येणार्‍या यासंदर्भातील विषयांनाही मंजुरी देण्याचे ठरल्यानंतर या सर्व विषयांना नियोजन आणि विकास समितीच्या शिफारशीनुसार मंजुरी देण्यात आली.

सभेतील महत्वाच्या घडामोडी

शाळा इमारती भाडे तत्वावरील मुदतवाढ लांबणीवर
गॅरेज विभागातील कामकाजाचा पंचनामा
 ऐनवेळेच्या सर्व पाचही विषयांसाठी विशेष सभा
 गॅस पाईपलाईन काम बंद वरुन आरोप - प्रत्यारोपपाणी पुरवठाकडील मक्तेदारांच्या बिलांचा विषय चर्चेत महापालिका करण्याबाबत मदन कारंडे यांची लक्षवेधीलेखा विभागातील त्रुटी दूर करण्यासाठी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com