शिष्यवृत्ती परिक्षेत शहरी विभागातून जयसिंगपूरची साई पाटील राज्यात दुसरी

निवास चौगले
Friday, 13 November 2020

कोल्हापूर ः शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत (पूर्व उच्च प्राथमिक, पाचवी) शहरी भागात जयसिंगपूरच्या सई राजेश पाटील हिने राज्यातील गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक मिळविला. तिने 95.13 टक्के गुण मिळविले. जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर ए. एन. नांद्रेकर ज्युनिअर महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. श्रद्धा अरविंद कामटे हिने 93.75 टक्के गुण मिळवून चौथे स्थान मिळविले. ऋजुल प्रशांत कनुनजे यानेही 93.75 टक्के गुण मिळवून संयुक्तपणे चौथे स्थान मिळविले. 

कोल्हापूर ः शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत (पूर्व उच्च प्राथमिक, पाचवी) शहरी भागात जयसिंगपूरच्या सई राजेश पाटील हिने राज्यातील गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक मिळविला. तिने 95.13 टक्के गुण मिळविले. जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर ए. एन. नांद्रेकर ज्युनिअर महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. श्रद्धा अरविंद कामटे हिने 93.75 टक्के गुण मिळवून चौथे स्थान मिळविले. ऋजुल प्रशांत कनुनजे यानेही 93.75 टक्के गुण मिळवून संयुक्तपणे चौथे स्थान मिळविले. 

श्रद्धा ही तात्यासाहेब मुसळे विद्यामंदिरची विद्यार्थिनी आहे. कनुनजे हा डी. के. टी. ई. इचलकरंजी हायस्कूलचा विद्यार्थी आहे. आठवी शिष्यवृतीत स्वाती रवींद्र दोरुगडे हिने गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक मिळविला. ती व्यंकटराव हायस्कूलची (आजरा) विद्यार्थिनी आहे. तिने 92.51 टक्के गुण मिळविले. पाचवीच्या 23 व आठवीच्या आठ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. 
ुपाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) मधील गुणवत्ता क्रमांकानुसार यशस्वी विद्यार्थी, क्रमांक सहा ः ईश्‍वरी कृष्णात डवरे, मूरगूड विद्यालय, 93.5, मुग्धा राजेंद्र सुतार, महाराणा प्रताप हायस्कूल, कोल्हापूर, 93.05. आठवा क्रमांक ः तन्मय रामचंद्र माने, भारती प्राथमिक विद्यांदिर, 92.36, समृद्धी सागर कोकरे, डी. के. टी. ई. इचलकरंजी हायस्कूल 92.36, 
अकरावा क्रमांक ः स्वराली सागर पाटील, तेजस मुक्त विद्यालय, 91.66, वेदांत तुकाराम दवणे, मराठी मीडियम हायस्कूल, नारायण मळा, 91.66, सिद्धांत राजकुमार पाटील, मराठी मीडियम हायस्कूल, नारायण मळा, 91.66, मधुरा शीतल मगदूम, डी. के. टी. ई. इचलकरंजी हायस्कूल, 91.66, स्वयंम सुरेश कदम, कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर इचलकरंजी, 91.66. 
तेरावा क्रमांक ः वरद बाळकृष्ण कदम, छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लज, 90.97. चौदावा ः तनिष्क नामदेव बेलवडकर, विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज, 90.90, सोळावा क्रमांक ः राजवर्धन सचिन चव्हाण, छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लज, 90.27, मनस्वी बाजीराव चौगले, शिवराज विद्यालय, मूरगूड, 90.27, मानस मनोज महाडेश्‍वर, श्री. राम. विद्यालय राजारामपुरी 90.27, स्पंदन ऋषीकेश कांबळे, बळवंतराव यादव हायस्कूल, पेठवडगाव, 90.27 
जान्हवी जयकुमार देसाई, जरगनगर विद्यामंदिर. 90.27. एकोणीसावा क्रमांक साक्षी संदीप कापडे, मुरगूड विद्यालय, 89.58 
सर्व्हेश सुधाकर पाटील, किलबिल विद्यामंदिर गडहिंग्लज, 89.58, सर्व्हेश सूर्यकांत माळी, जीवनकल्याण प्राथमिक विद्यालय, 89.58, देविका अरविंद पुलगुरले, व्यंकटराव हायस्कूल, आजरा, 89.58 

आठवी (पूर्व माध्यमिक) चौदावा क्रमांक ः वेदांत सुधाकर झेंडे, लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर, 90.47, पंधरावा क्रमांक वेदांत गुरुदेव साबळे, विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज, 89.79, श्‍वेता महेश चव्हाण, देशमुख हायस्कूल, कोल्हापूर, 89.79, अपूर्वा अजित वसवाडे डी. के. टी. ई. इचलकरंजी, 89.79. सतरावा क्रमांक ः रेहान शहानूर मुल्लाणी, जनता माध्यमिक विद्यालय, हुपरी, 89.11, दीपाली आनंदा मोहिते, आजरा हायस्कूल, 89.11, सृष्टी विद्यासागर होनमाने, तात्यासाहेब मुसळे विद्यामंदिर, 89.11

 

संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From the urban section in the scholarship examination Sai Patil of Jaysingpur is second in the state