मास्क वापरला, पण सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

used a mask, but the social distance was blown away
used a mask, but the social distance was blown away

इचलकरंजी : तब्बल 72 तासांच्या 100 टक्के लॉकडाऊननंतर आज सकाळी 6 ते 11 या वेळेत शिथिलता देण्यात आली. या कालावधीत भाजीपाला व किराणा खरेदीसाठी नागरिकांची अक्षरश: झुंबड लागली होती. बहुतांश लोकांनी मास्क घातला असला तरी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला होता. त्यामुळे समूह संसर्गाचा शहराचा धोका वाढण्याची भिती कायम आहे. 

शहरात कोरोनाचे रूग्ण गेल्या तीन आठवड्यापासून दररोज आढळून येत आहेत. शतकाच्या समीप रूग्ण संख्या आली आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर समूह संसर्ग टाळण्यासाठी शहर सनियंत्रण समितीने सलग 72 तासाचा 100 टक्के लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर आज सकाळी 6 ते 11 या कालावधीत भाजीपाला व अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी शिथीलता दिली होती. गेली तीन दिवस घरात बसून लॉकडाऊनला प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी आज मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत मोठी गर्दी केली. 

पालिकेने गर्दी होऊ नये यासाठी शहरातील विविध 11 ठिकाणे भाजीपाला विक्रीसाठी निश्‍चित केली होती. वृद्धाना खरेदीला येण्यासाठी मनाई झाली होती. वाहन वापरावरही निर्बंध घालण्यात आले होते. मात्र सर्व नियम पायदळी तुडवून आज खरेदीसाठी नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली. शहरातील विविध भागातही भाजीपाला विक्री करण्यात आली. पालिका प्रशासनाकडून नागरिकांना सातत्याने सुचना करण्यात येत होत्या. मात्र त्यांच्या सुचनाकडे दुर्लक्ष करत नागरिक भाजीपाला खरेदी करत होते. त्यामुळे शहरात समूह संसर्गाचा धोका कायम आहे. 

चिरमुरे, अंडी आणि मटणही... 
गेल्या तीन दिवसांपासून लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद होती. आज सकाळी भाजीपाला खरेदी बरोबरच नागरिकांनी चिरमुरे, अंडी आणि मटण व चिकन खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करीत नागरिकांनी रांग लावली होती. 

मंगळवारपर्यंत लॉकडाऊन 
आज सकाळच्या सत्रात शिथीलता दिली असली तरी 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन त्यानंतर लॉकडाऊनबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली. 

दृष्टिक्षेप
- 72 तासांच्या 100 टक्के लॉकडाऊननंतर शिथिलता 
- 11 ठिकाणी शहरातील भाजीविक्रीस परवानगी 
- पालिकेच्या सुचनांकडे दुर्लक्ष 
- वृद्धांना खरेदीला येण्यासाठी मनाई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com