
जिल्ह्यातील 39 खासगी रुग्णालयात 150 रुपये लसचे आणि 100 रुपये सेवा शुल्क असे एकूण 250 रुपयेला ही लस दिली जाणार आहे
कोल्हापूर : जिल्ह्यात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 45 ते 49 वयोगटातील इतर आजार असणाऱ्या 6 लाख 61 हजार 948 लोकांना तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लस दिली जाणार आहे. यासाठी, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, महानगरपालिका आरोग्य केंद्र व खासगी अशा एकूण 120 केंद्रावर आजपासून लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात 17 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भविष्यात एकाही रुग्णाचा किंवा ज्येष्ठांचा मृत्यू होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संर्सग रोखण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. यासाठी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून जेष्ठ नागरीकांना ऑनलाईन बुकींगसाठी मदत केली जाईल. ऑन द स्पॉट नोंदणीची माहिती देतील तसेच ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, शिक्षक, कोतवाल व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे माध्यमातून या संदर्भात जनजागृती करतील. सर्व कोरोना लसीकरण केंद्र असलेल्या शासकीय व खाजगी रुग्णालयांनी सुध्दा त्या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविध उपलब्ध करुन देतील व ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी मार्गदर्शन व मदत करतील. आतापर्यंत 35 हजार 830 जणांना लस दिली आहे.
कोविड लसीकरणसाठी अपेक्षित लाभार्थी संख्या :
60 वर्षावरील लाभार्थी : 5 लाख 9000
45 ते 59 व्याधीग्रस्त (कोमॉरबीड) लाभार्थी : 1 लाख 52 हजार 948
यांना दिली जाणार लस
आरोग्य अधिकारी, पोलीस, महसूल, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील अधिकारी व कर्मचारी यांना डोस दिला जाणार आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांना प्राधान्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे.
दुसरा डोस कधी?
पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 दिवसांनी घ्यावा लागतो. दुसरा डोस घेताना 29 व्या दिवशी कोविन पोर्टलमार्फत आपोआप त्याच लसीकरण केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसची नोंदणी करणे गरजेचे नाही.
अशी करा नोंदणी :
www.cowin.gov.in या संकेत स्थळावर जावे. त्या ठिकाणी रजिस्टर फॉर व्हॅक्सिन पर्याय निवडा. त्यामुळे मोबाईल नंबर टाका. मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकून व्हेरीफाय करावे. त्यानंतर नोंदणी पानावर माहिती भरावी. यामध्ये, ओळखपत्र निवड, त्यांचा क्रमांक व तुमचे संपूर्ण नाव भरा. जे 45 वर्षावरील जे आजारी आहेत. त्यांनी आपला आजाराचे स्वरूप व डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडावे. माहिती भरुन रजिस्टर ऑपशनवर क्लिक करावे. तसेच याच नावावने मोबाईल ऍप डाऊनलोड करुन एका मोबाईल वरून चौघांची नोंदणी करता येते. आरोग्य सेतूमधूनही नोंदणी करता येणार आहे.
खासगी रुग्णालयात 250 रुपयेला लस :
जिल्ह्यातील 39 खासगी रुग्णालयात 150 रुपये लसचे आणि 100 रुपये सेवा शुल्क असे एकूण 250 रुपयेला ही लस दिली जाणार आहे.
येथे होईल लसीकरण :
प्राथमिक आरोग्य केंद्र 75, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये 21, महानगर पालिका आरोग्य केंद्र 8 व खासगी रुग्णालये 16 अशी एकूण 120 केंद्रावर लसीकरण होणार आहे. भादवण, मलिग्रे, ऊत्तूर, वाटंगी (ता. आजरा). कडगाव ब्रुदूक, मडिलगे, मिणचे खुर्द, पाटगाव, पिंपळगाव (ता. भुदरगड). अडकूर, हेरे, कणूर, कोवाड, मानगाव, तुडिये (ता. चंदगड). हलकर्णी, कडगाव, कानडेवाडी, महागाव, मूंगूरवाडी,नूल (ता. गडहिंग्लज). गरिवडे, निवडे (ता. गगनबावडा). अंबप, आळते, भादोले, हेर्ले, हूपरी, कोडोली, पुलाची शिरोली (ता. हातकणंगले). भूये, हसूर, इस्पूर्ली, कणेरी, मुडशिंगी, सांगरूळ, शिरोली दुमाला, उचंगाव, वडणगे (ता. करवीर). बाजार भोगाव, बोरपाडळे, कळे, केखले-पोखले, कोतोली, पडळ (ता. पन्हाळा). धामोड, राशिवडे, सरवडे, तारळे, ठिकपूर्ली, वाळवा (ता. राधानगरी). आंबा, बांबवडे, भेडसगाव, करंजफेन, मान, मांजरे, परळी-निनाई, शित्तूर, सरुड, साजणी व सावर्डे (ता. शाहूवाडी). चिखली, कापशी, पिंपळगाव, कसबा सांगाव, सिध्दनेर्ली (ता. कागल). अब्दूललाट, दोनाळी, घालवाड, जयसिंगपूर, नांदणी, नरसिंहवाडी, टाकळी (ता. शिरोळ). तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामध्ये आजरा, गारगोटी, चंदगड, गडहिंग्लज, नेसरी, गगनबावडा, इचलकरंजी, पारगाव, हातकणंगले, कागल, मुरगूड, गांधीनगर, बावडा, खूपीरे, पन्हाळा, कोडोली, राधानगरी, सोळांकूर, मलकापूर, शिरोळ, दत्तवाड. देसाई हॉस्टिल व संत गजानन महाराज हॉस्पिटल (गडहिंग्लज). कुडाळकर हॉस्पिटल (पेठ वडगाव), हद्या हॉस्पिटल (हेर्ले), अलायन्स हॉस्पिटल (इचलकरंजी), सिध्दगिरी हॉस्पिटल (कणेरी), अथायू (उजळाईवाडी), यशवंत धर्मादाय हॉस्पिटल (कोडोली), संजीवनी हॉस्पिटल (बोरपाडळे). तसेच शथायू, केपीसी, ऍपल, डी.वाय.पाटील, डायमंड, सिध्दीविनायक नर्सिंग होम (कोल्हापूर).
महानगरपालिका क्षेत्रात या ठिकाणी होणार लसीकरण :
सिध्दार्थ नगर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, राजारामपूरी, पंचगंगा रुग्णालय, महाडिक माळ, फिरंगाई, सीपीआर हॉस्पिटल व सदर बाजार (कोल्हापूर).
कोरोना लसीचे अपेक्षित लाभार्थी :
60 वर्षावरील लाभार्थी : 50900
45 ते 59 व्याधीग्रस्त (कोमॉरबीड) लाभार्थी : 152948
हेल्थकेअर वर्कर : 38256
फंटलाईन वर्कर : 29889
एकूण : 731373
संपादन - धनाजी सुर्वे