आता प्रदूषणाला बसणार आळा; कोल्हापूरच्या युवकाचे संशोधन

नंदिनी नरेवाडी- पाटोळे 
Friday, 22 January 2021

ऊर्जा साठविणारा ‘सुपर कपॅसिटर सोलर सेल’

डॉ. बाबासाहेब संकपाळ यांची निर्मिती; वाहनांच्या वापरातून

कोल्हापूर:  जगभरामध्ये प्रदूषण हा मोठा चर्चेचा विषय आहे. प्रदूषणाला आळा बसवण्यासाठी देशभरांमध्ये अनेक उपाय सुरु आहेत.  सध्या युवा पिढीचा कल गाड्या वापरण्याकडे आहे. यामुळे सगळ्यात जास्त प्रदूषण हे वाहनांच्या वापरातून होते.  टेसला या कंपनीने ईकार बनवली पण ही कार मार्केटमध्ये सगळ्यांच्या वापरात येईल याला वेळ लागेल.  मात्र  कोल्हापूरच्या  डॉ. बाबासाहेब संकपाळ यांनी प्रदूषणाला आळा घालण्याचा पर्याय शोधून काढलाय  काय हा फाॅम्युला चला जाणून घेऊया ...

वाढत्या प्रदूषणाला  बसणार  असा आळा

घराघरांतील विजेचे दिवे काही प्रमाणात सौरऊर्जेद्वारे प्रकाशित होऊ लागले आहेत, मात्र सोलर सेलच्या माध्यमातून तयार होणाऱ्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करून ती बॅटरीत साठवली जाते. बॅटरीत ही ऊर्जा साठवल्यानंतर मर्यादित कालावधीसाठीच त्याचा वापर होतो. हीच सौरऊर्जा घन पदार्थात साठवणूक करणारा ‘सुपर कपॅसिटर सोलर सेल’कोल्हापूरच्या डॉ. बाबासाहेब संकपाळ यांनी तयार केला आहे. या सुपर कपॅसिटरचा वापर चारचाकी वाहने, बसेसमध्ये करता येणार असून, वाढत्या प्रदूषणाला आळा बसणार आहे.

सोलर सेलची निर्मितीत योगदान

डॉ. संकपाळ मूळचे अक्कोळचे (कर्नाटक). त्यांचे बीएसस्सीचे शिक्षण देवचंद महाविद्यालयात झाले. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एमएस्सीचे शिक्षण पूर्ण केले व पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर भारत सरकारच्या सायन्स आणि टेक्‍नॉलॉजी विभागाकडून नोबेल विजेत्यांची जर्मनीत होणाऱ्या बैठकीसाठी निवड झाली. जर्मनी (बर्लिन)च्या हनमाईटनर इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून तीन वर्षे कार्य केले. तेथे विशिष्ट केमिकल प्रक्रिया वापरून लवचिक सोलर सेलची निर्मितीत योगदान दिले. 

हेही वाचा- भाजपमध्ये अनेकजण वैतागलेले; सुप्रिया सुळेंच मोठ वक्तव्य -

२००५ ला जपानमधील गिफू विद्यापीठात रंगीत सोलर सेलबाबत संशोधन केले. या संशोधनातील त्यांनी बनविलेला सोलर सेल घराचे छत म्हणूनही वापरता येतो. रंगीत अशा सोलर सेलमुळे छत आणि ऊर्जानिर्मिती असे दोन्ही उद्देश साध्य करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना मटेरियल रिसर्च सोसायटी, जपान या संस्थेकडून ‘यंग सायटिंस्ट’ या पुरस्काराने गौरविले. अमेरिकेतही त्यांनी कार्बन नॅनोट्यूब या विषयावर संशोधन केले आहे.त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात चार वर्षे प्राध्यापक म्हणून कार्य केले. सध्या ते विश्‍वेश्‍वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (व्हीएनआयटी) मध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संपादन केली आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vehicle research Supercapacitor solar cell dr babasaheb sankpal