बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी विनयभंग करून तरूणीला धमकी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

तरूणीला ठार मारण्याची धमकी देण्यासह अश्‍लिल शेरेबाजी करीत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इचलकरंजी - न्यायालयात सुरू असलेला बलात्काराचा खटला मागे घेण्यासाठी पीडित तरूणीला ठार मारण्याची धमकी देण्यासह अश्‍लिल शेरेबाजी करीत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबात शिवाजीनगर पोलिसांनी मन्साराम विश्‍वकर्मा आणि केतन केसरवाणी (दोघे पुजारी मळा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गतवर्षी पीडित तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी मन्साराम विश्‍वकर्मा याच्यावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्याबाबतचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. गुन्ह्यात मन्साराम याची जामिनावर मुक्तता झाली आहे. 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान पुजारी मळा परिसरात पीडितेला पुन्हा त्रास दिला.

हे पण वाचाVideo - राजू शेट्टी यांच्यावर पुण्यात उपचार सुरू ; कार्यकर्त्यांना केले हे आवाहन

 

पीडिता ही आरतीला जात असताना त्याचबरोबर किराणा, दळपाचे व अन्य कामासाठी ये-जा करत असताना मन्साराम व त्याचा साथीदार केतन यांनी तिचा पाठलाग करून शिवीगाळ करीत अश्‍लिल शेरेबाजी केली. तसेच बलात्कारचा खटला मागे घे, अन्यथा तुला ठार मारू, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित तरूणीने याबाबत पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून संबंधित दोघांवर गुन्हा दाखर करण्यात आला आहे. 

हे पण वाचाबाप रे; शिर धडावेगळे केले अन् गावात येऊन ओरडून सांगू लागला

संपादन - धनाजी सुर्वे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: victim threatened to withdraw rape case