जोतिबा डोंगरावर येताय; पायथ्याला असणारी लेणी पाहीलीय का?

 निवास मोटे 
Monday, 23 November 2020

भाविकांना  पाहण्यासारखे एक ठिकाण आहे ते म्हणजे ऐतिहासिक पांडव लेणी

जोतिबा डोंगर (कोल्हापूर): दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक, आंध्रप्रदेश ,गुजरात या राज्यातून दरवर्षी सुमारे ९० लाखाच्या आसपास भाविक येतात. दर्शन घेतात. याच भाविकांना  पाहण्यासारखे एक ठिकाण आहे ते म्हणजे ऐतिहासिक पांडव लेणी.

 ती आहेत ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गिरोली घाटात व पोहाळे गावच्या हद्दीत. जोतिबा डोंगरावरुन अगदी हाकेच्या अंतरावर ही लेणी आहेत. हा परिसर हिरवागार रम्य देखणा असून विविध हिंदी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी केले जाते.

 या लेण्यांमध्ये सभागृह, नाट्यगृह, स्वयंपाकघर, दिवाणखाना बैठकीसाठी ओटी पिण्याचे पाण्याचे गोड झरे गुहा , भयारी मार्ग हे सर्व एकाच दगडामध्ये कोरलेले आहे. प्रत्येक लेण्यात प्रत्येक खांबावर कलाकुसर आहे. या लेण्यात महादेवाचे छोटे मंदीर ही आहे. लेण्यात असणाऱ्या दोन्ही झाडांना एप्रिल, मे च्या उन्हाळ्यात ही भरपूर पाणी असते.

हेही वाचा- हातकणंगले तालुक्‍यातील शिक्षक कोरोना चाचणीपासून दूर -

 पूर्वी ही लेणी फार दुर्लक्षित होती परंतु गेल्या सात-आठ वर्षात या लेण्यांचा भारतीय पुरातत्त्व खात्याने पूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. हा परिसर स्वच्छ व चकचकीत झाल्याने   दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. या लेण्यात भारतीय पुरातत्व खात्याने देखभालीसाठी कायमस्वरूपी एक कर्मचारी नेमला असून तो दररोज देखभाल करतो. त्यामुळे हा   परिसर स्वच्छ व देखणा दिसत आहे.
 

लेणीं कडे जाण्यासाठी मार्ग 

जोतिबा डोंगरातून- गिरोली घाट कोल्हापूर कडे जाणाऱ्या मार्गावर लेणी

कोल्हापूरातून येताना वडणगे निगवे कुशिरे पोहाळे मार्गी गिरोली घाटात लेणी

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: visit on jyotiba temple see for Caves kolhapur