जुन्या पुस्तकांच्या बाजाराला ग्राहकांची प्रतीक्षा 

waiting for the old book market
waiting for the old book market

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील राजाराम टॉकीज अन्‌ श्रीमंत आईसाहेब महाराज पुतळ्यासमोर शिवाजी तंत्रनिकेतनची इमारत दिसते. या इमारतीच्या मागील बाजूस जुन्या पुस्तकांचा बाजार आहे. हा बाजार 40 ते 45 वर्षे सुरु आहे; मात्र यावर्षीच्या कोरोनाचं महासंकट उभे राहीलं आणि जूनपासून सुरु न झालेल्या शाळांमुळे विद्यार्थी, पालकही या बाजारात अजून आलेले नाहीत. पुस्तकाच्या स्टॉल समोर दिवसभर उभे राहील्यानंतर एक-दुसरा विद्यार्थी, पालक आवश्‍यक पुस्तके घेऊन जात आहे. हे विक्रेते विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत उभे आहेत. 

या बाजाराचे वैशिष्ठ्य म्हणजे, पहिलीपासून ते ग्रॅज्युएजटपर्यंत आणि डिग्री, डिप्लोमा, युपीएससी, एमपीएससी, सीडीसी, एनडीए अशा सर्व स्पर्धा परीक्षातील पुस्तके इथे मिळतात. 40 वर्षांपूर्वी हा बाजार पापाची तिकटी इथे होता. नंतर तो बिंदू चौकात आला. तिथून हा बाजार लक्ष्मीपुरीत येऊन स्थिर झाला. महापालिकेने शिवाजी तंत्रनिकेतनच्या मागील बाजूस जी गल्ली आहे. तिथे 16 केबिनसाठी जागा दिली. 

पुस्तके देण्या-घेण्याची ही प्रक्रिया दरवर्षी सुरु असते. आता लॉकडाऊनमुळे हा बाजार अजून थंड आहे. ऑगस्ट नंतर शाळा, महाविद्यालये सुरु होतील. तेव्हा विद्यार्थी, पालक इथे पुस्तके घेण्यासाठी येण्यास सुरवात होईल. इथे 16 विक्रेते आहेत.

ओढ्यावरील गणपती समोर नेताजी कदम यांचेही असेच जुनी पुस्तके विक्रीचा व्यवसाय आहे. इथेही शालेय पुस्तके मिळतात. याबरोबर श्री. कदम हे बाईंडिंगच्या वह्या ही विक्री करतात. जेणेकरुन गरीब विद्यार्थ्यांना या बाईंडिंगच्या वह्या वापरता येतील. महाद्वार रोड येथील कुंभार गल्लीच्या बाजूलाही असेच जुनी पुस्तकाचे एक दुकान आहे. तिथेही शालेय पुस्तके मिळतात. 
... 

प्रथम ते तृतीय वर्षांच्या परिक्षा रद्द झाल्या आहेत. आम्ही पुस्तके खरेदी केली आहेत; मात्र विद्यार्थ्यांनी पुस्तके खरेदी केलेली नाहीत. परीक्षा झाल्यानंतर किंवा रिझल्ट नंतर हे विद्यार्थी खरेदीसाठी येतील. विक्रेत्यांकडून पुस्तके 70 ते 75 टक्‍क्‍यांनी विक्री केली जाते, असा हा व्यवहार असतो; पण गरीब, गरजू विद्यार्थ्यांना कमी किंमतीत पुस्तके दिली जातात. 
- उदय साळोखे, विक्रेते 


दृष्टिक्षेप :
- पुस्तक विक्रेत्यांना शिवाजी तंत्रनिकेतनच्या मागील बाजूस 16 केबिन 
- 40 ते 45 वर्षांपासून जुन्या पुस्तकांचा बाजार 
- लॉकडाउनमुळे जुन्या पुस्तकांचा बाजार थंडच 
- शाळा, कॉलेज सुरू झाल्यानंतर व्यवसायाला मिळणार गती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com