...अन्यथा आंदोलन ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या  प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली.

कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा ९ ऑगस्टला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयकांच्या ऑनलाईन बैठकीत दिला आहे.

बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या  प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली. मराठा समाजाने आजवर अनेक आंदोलने केली, मराठ्यांने काढलेले ५७ मूक क्रांती मोर्चे शांततापूर्वक झालेल्या आंदोलनाचे उत्तम उदाहरण आहे. याचबरोबर मेडिकलच्या पीजी विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन करून त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या. कोरोना सुरू व्हायच्या आधी ESBC २०१४ चे उमेदवारसुद्धा अशाच प्रकारे शांततेत आंदोलन करत होते. आंदोलने म्हणजे  हातात दगड घेणे नाही, मराठा समाज तर याचे समर्थन कधीच करत नाही. देशात अनेक राज्यांनी हिंसक आंदोलने बघितली; पण कायद्याच्या कसोटीत उतरल्याशिवाय आरक्षण भेटत नाही, हे मराठ्यांनी दाखवून दिले आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

मराठा समाजाच्या तरुणांना खोट्या गुन्ह्यांत अडविले होते; परंतु ते गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अजून प्रलंबित आहे. येत्या ७ जुलैला मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू होणार आहे. पण, सरकार दरबारी मात्र त्याबद्दल अजून अनास्थाच आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र दिल्यानंतर घाईत उपसमितीची बैठक घेतली. त्यावर अजून ठोस काम नाही. सारथी, अण्णासाहेब   महामंडळ यांची अवस्था तशीच आहे. या परिस्थितीत हाताची घडी घालून बघणारा मराठा समाज नाही.

हे पण वाचा -  शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी ११ जणांचे अर्ज

 

हे पण वाचा - काय सांगताय ! चक्क आपल्या 'लाल परीत' वाहिले जात आहेत 'हे' दगड...

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: warning of maratha kranti morcha to maharashtra government