वॉटर एटीएम बदंच   21 पैकी चार ठिकाणी जागा उपलब्ध नाही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

जिल्हा नियोजन मंडळ, समाजकल्याण विभागाकडून जिल्हा परिषदेला वॉटर एटीएम दिली. मात्र त्यात अनियमितता झाली आहे. त्यासंदर्भातील चौकशी पूर्ण झाली आहे. अहवाल येणे बाकी आहे. तोपर्यंत मागील सरकारच्या काळात पाणी पुरवठा विभागाकडून राज्यात ठिकठिकाणी वॉटर एटीएम दिली. जिल्ह्यात 21 वॉटर एटीएम दिली असून त्यातील चार ठिकाणी जागा उपलब्ध झालेली नाही

कोल्हापूर : जिल्हा नियोजन मंडळ, समाजकल्याण विभागाकडून जिल्हा परिषदेला वॉटर एटीएम दिली. मात्र त्यात अनियमितता झाली आहे. त्यासंदर्भातील चौकशी पूर्ण झाली आहे. अहवाल येणे बाकी आहे. तोपर्यंत मागील सरकारच्या काळात पाणी पुरवठा विभागाकडून राज्यात ठिकठिकाणी वॉटर एटीएम दिली. जिल्ह्यात 21 वॉटर एटीएम दिली असून त्यातील चार ठिकाणी जागा उपलब्ध झालेली नाही. तर इतर ठिकाणी ती बसलीच नसल्याच्या तक्रारी आहेत. वर्षभर पाठपुरावा करुनही वॉटर एटीएम सुरु होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. 

जिल्हा परिषदेला ग्रामीण भागात वॉटर एटीम बसवण्यासाठी सलग दोन वर्षे निधी मिळाला. मात्र या निधीचा वापर वादग्रस्त ठरला आहे. या कामाचे टेंडर, निधी देणे, गावात वॉटर एटीएम बसवणे यात गैरमेळ असल्याचे पुढे आले. "सकाळ'ने हा सर्व प्रकार उघडकीस आणल्यानंतर मंत्रालयीन समितीने या सर्व प्रकाराची चौकशी केली. याचा अहवाल येणे बाकी आहे. यातच आता राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने मंजूर केलेल्या वॉटर एटीएममधील गैरप्रकार पुढे येत आहे. ज्या 21 गावांना ही एटीएम मंजूर झाली आहेत, त्यातील अनेक एटीएम मंजूर अजून कार्यरत नाहीत. याबाबत सतत तक्रारी करुनही ती सुरु झाली नसल्याने तर काही ठिकाणी वेळेत सुरु न झाल्याने ग्रामस्थांकडून तक्रारी सुरु आहेत. 

वॉटर एटीएमसाठी मंजूर झालेली गावे अशी: 
*हातकणंगले- कोरोची, तारदाळ, मिणचे, हेर्ले, कुंभोज. 
*शिरोळ - चिंचवाड, गणेशवाडी, आलास, अकीवाट, खिद्रापूर, दत्तवाड, घोसरवाड, अब्दुललाट, टाकवडे, शिरढोण, यड्राव, जांभळी, हेरवाड, चिपरी, निमशिरगाव. *पन्हाळा- सातवे. 

यड्राव येथील वॉटर एटीएम सुरु करण्याबाबत मागणी करत आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. वॉटर एटीएम उभे करण्यासाठी केवळ सांगाडा बांधून ठेवला आहे. मात्र त्यात मशीन बसवलेले नाही. जिल्हा स्तरावरील यंत्रणा जबाबदारी ढकलत असल्याने आता मंत्रालयात दाद मागणार आहे. 
- राजवर्धन निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य, यड्राव.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water ATMs are not available in four of the 21 places