esakal | कोल्हापुरातील काही भागात सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply will be cut off in some parts of Kolhapur on Monday

मंगळवारी 24 नोव्हेंबर  2020  रोजी पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार असल्याचे जलअभियंता नारायण भोसले यांनी कळविले आहे.

कोल्हापुरातील काही भागात सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  शहरातील संपूर्ण ए, बी व ई वॉर्ड व त्यास सलग्नीत उपनगरे आणि ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवारी  23 नोव्हेंबर  2020 ला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवारी 24 नोव्हेंबर  2020  रोजी पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार असल्याचे जलअभियंता नारायण भोसले यांनी कळविले आहे.

 महाराष्ट राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून दुरुस्ती कामासाठी सोमवारी (ता.23 नोव्हेंबर) शिंगणापूर योजनेवरील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणाऱ्या  शहरातील संपूर्ण ए, बी व ई वॉर्ड आणि त्यास सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना  23 नोव्हेंबर  2020 ला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तर  24 नोव्हेंबर  2020  पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.

ए, बी वॉर्ड आणि त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भाग व शहराअंतर्गत येणा-या साळोखे नगर, कणेरकरनगर, बापुरावनगर, आयटीआय, कळंबाजेल, आपटेनगर, दत्तोबा शिंदेनगर, जीवबानाना पार्क, सुभाषनगर, दादू चौगुलेनगर,जरगनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी, संभाजीनगर, एलआयसी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखे पार्क, जवाहरनगर, वायपीपोवारनगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, टिंबरमार्केट, गंजीमाळ, वारेवसाहत, विजयनगर इत्यादी परिसर तसेच ई वॉर्डमधील राजारामपुरी वितरण व्यवस्थेवर अवलंबून असणारा संपूर्ण परिसर, त्यामध्ये सम्राटनगर, प्रतिभानगर, सायबर चौक, राजारामपुरी, शाहुमिल, उद्यमनगर, यादवनगर,राजेंद्रनगर, टाकाळा, दौलतनगर, शाहुपुरीतील काही भाग, पाचबंगला, साईक्स एक्स्टेंनशन, कावळानाका, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल,सहयाद्री सोसायटी, कदमवाडी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजीपार्क, महाडीक वसाहत इत्यादी भागाचा समावेश आहे.

हे पण वाचा नगराध्यक्षांच्या दालनात कचऱ्याचा धूर


या भागातील नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकर व्दारे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, तसेच या कालावधीत बालिंगा, बावडा व कळंबा जलशुध्दीकरण केंद्राव्दारे होणारापाणीपुरवठा नियमित असणार असलयाचेही  असे जलअभियंता नारायण भोसले यांनी स्पष्ट केले.


संपादन - धनाजी सुर्वे