"आमचं ठरलंय...' होय, टॅगलाईन नाही नवा पक्ष 

"We have decided ... 'Yes, no new party tagline
"We have decided ... 'Yes, no new party tagline

कोल्हापूर : "आमच ठरलंय' या एका टॅगलाईनने लोकसभा निवडणुकीत धुरळा उडवून दिला होता. पुढे विधानसभा निवडणुकीतही याच टॅगलाईनची जादू चालली. आता तर चक्क या नावाने पक्षालाच मान्यता मिळाली आहे. हा पक्ष नोंदणीपुरता मर्यादित आहे, की निवडणुका लढविण्यासाठी आहे, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईलच. मात्र राजकारणात दबावतंत्राचा वापर कोणत्या पद्धतीने करता येते, याचे नवे उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल. 

लोकसभा निवडणुकीत तर प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्‍य होते ते म्हणजे "आमच ठरलंय', ज्या राजकीय पक्षाकडून विरोधी उमेदवार उभे होते, त्या पक्षाला थेट विरोध करता येत नाही. त्यांचे नेतृत्व दुखावले जाऊ नये या हेतूने "आमच ठरलंय' चा नारा दिला गेला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी "मी बी ध्यानात ठेवलंय...' असे सांगून त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. 
महापालिकेच्या राजकारणात ताराराणी आघाडीची स्थापना वैयक्तीक महत्वकांक्षेतून झाली. 

पक्षापेक्षा वैयक्तीक महत्व वाढविण्याचा प्रयत्न झाला. पक्ष येतील आणि जातील आपले नाव मोठे झाले पाहीजे, हाच हेतू यामागे होते. पक्ष कार्यालयात उमेदवारी निश्‍चित होण्यापेक्षा ती खासगी ठिकाणी निश्‍चित होऊ लागली. या आघाडीत त्यावेळी जे नेते होते, ते आता परस्परांपासून दुरावले असले तरी ही मंडळी त्यावेळी या आघाडीचाच एक भाग होती. नंतर राजकीय मतभेद नव्हे तर वैर निर्माण झाले आणि त्यातून बदल्याच्या भावनेतून "आमच ठरलंय' या टॅगलाईनचा जन्म झाला. 

पक्ष कोणताही असला तरी निवडणुकीतील तिकीट वाटप, जी काही धोरण आहेत ती पक्षाच्या जाजमावर ठरायला हवीत, असा आग्रह धरला गेला. त्याचे स्वागतही झाले. मात्र काळ बदलला. प्रमूख सत्ताकेंद्रे हाती आली. विधानसभेला जागा वाढल्या, लोकसभेची निवडणूक "आमच ठरलयं...' मुळेच यशस्वी झाली, असा दावा केला.

टिकायचे असल्यास तर स्वतंत्र गट हवा. असा गट असला की दबावगट निर्माण होतो. अन्य कोणत्याही प्रमूख राजकीय पक्षाला या गटाला सोबत घेतल्याशिवाय सत्ता मिळणार नाही, असा ही हेतू यामागे आहे. महापालिकेच्या राजकारणात अपक्ष म्हणून निवडून आलेले सदस्य कायम दबाव निर्माण करतात. त्यांचा हेतू सफल होऊ नये यासाठी नवा गट तयार गेल्याचे मानले जाते. 

ताकद वाढली, पक्ष अडचणीत 
एखाद्या निवडणुकीत आपली ताकद वाढली आहे हे ध्यानात आल्यानंतर असे गट तयार केले जातात. त्यातून या गटाचे प्राबल्य वाढत असले तरी प्रमूख राजकीय पक्ष मात्र अडचणीत येतात. ताराराणी आघाडी स्थापन करून पक्षांची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तोच प्रयत्न आता "आमच ठरलयं' ही टॅगलाईन करते की नोंदणी पुरता पक्ष मर्यादित राहतो, याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 
 

दृष्टिक्षेप 
- "आमचं ठरलयं' या टॅगलाईनचा लोकसभा, विधासभेत धुरळा 
- "आमचं ठरलयं' नावाने पक्षाला मान्यता 
- नवीन पक्ष नोंदणी कशासाठी? येत्या काळात समजणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com