कारखान्यात वेल्डरच मिळेनात ;  अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या कमी 

Welders were not found in the factory; Decreased number of students for the course
Welders were not found in the factory; Decreased number of students for the course
Updated on

कोल्हापूर  : औद्योगिक क्षेत्रात वेल्डिंग कामासाठी कामगारांची कमतरता आहे. तर जिल्ह्यातील खासगी, शासकीय आयटीआयमध्ये वेल्डर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद आहे. स्वतःच्या व्यवसायाबरोबरच चांगल्या पगाराची नोकरी देणाऱ्या या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. 
औद्योगिक क्षेत्रातील परप्रांतीय कामगारदेखील कोरोनाच्या भीतीमुळे मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे वेल्डरांचा तुटवडा आहे. वेल्डिंग क्षेत्रात रोजगाराची संधी व नोकरीची हमी असल्याने स्थानिक तरुणांनी या अभ्यासक्रमाकडे वळणे गरजेचे आहे. जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहती आहेत. येथील सुमारे 80 ते 90 टक्के कारखाने फॅब्रिकेशनचा वापर करुन बांधलेले आहेत. अनेक कारखान्यात विविध प्रकारची वेल्डिंगची कामे आहेत. यात शेती अवजारे, फाउंड्री भट्टी, टॅंक, इरिगेशन पाईपिंग, वैरण व ऊस वाहतूक बैलगाडी, लोखंडी कैच्या, दवाखाना व हॉटेलमधील बेड, टेबल, फर्निचर, किचन 
ट्रॉली, खवा मशिन, कापणी व मळणी यंत्रे, ग्रील्स, गेट, रुफिंग, हॉस्पिटलमध्ये लागणारे फर्निचर अशी कामे करण्यासह अन्य कामासाठी वेल्डरांची आवश्‍यकता आहे. 

वेल्डर ट्रेडच्या 
85 टक्के जागा रिक्त 
जिल्ह्यात खासगी 40 व शासकीय 12 आयटीआय आहेत. यापैकी खासगी 14, शासकीय 9 आयटीआयमध्ये वेल्डर ट्रेडच्या जागा आहेत. जिल्ह्यात खासगी आयटीआयमध्ये 500 तर शासकीय आयटीआयमध्ये 360 जागा अशा एकूण 860 जागा वेल्डरसाठी आरक्षित आहेत. खासगी आयटीआयमधील 500 जागांपैकी 188 विद्यार्थ्यांनीच अर्ज भरले आहेत. तरीही 80 ते 85 टक्के जागा रिक्त राहतात. 

करिअरची संधी 
वेल्डिंग क्षेत्रात कामाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, तसेच नोकरीची हमी आहे. त्याचबरोबर फॅब्रिकेशन कामे वजनावर (मेट्रिक टन) मिळत असल्याने उत्पन्नही चांगले मिळते. नवीन मुलांना या क्षेत्रात करिअरची संधी आहे. 

जिल्ह्यात शासकीय व खासगी आयटीआयची संख्या 52 आहे. यापैकी वेल्डर कोर्स असलेल्या संस्थेत 20 टक्के मुलांनी वेल्डर कोर्स प्रवेशासाठी विकल्प निवडल्याचे दिसते. हा कोर्स कमी वेळेत व कमी खर्चात पूर्ण करता येतो. त्यामुळे नोकरीची संधी लवकर उपलब्ध होते. तसेच स्वतःचा उद्योगही सुरू करता येतो. 
- अमोल वास्कर, प्राचार्य, आयटीआय हमिदवाडा. 

जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात स्थानिक वेल्डरांची कमतरता आहे. या क्षेत्रात तरुणांना अनेक संधी उपलब्ध आहेत. चांगले करिअर करता येते. 
स्वतःच्या व्यवसायाबरोबरच चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. 
- गोरख माळी, मॅक अध्यक्ष, फाईव्हस्टार, कागल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com