सुप्रसिद्ध फाय ग्रुपचे अध्यक्ष पंडितराव कुलकर्णी यांचे निधन...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

उद्योग समूहाच्या माध्यमातून इचलकरंजीचे नावलौकिक जगभर पंडित काका यांनी केले होते.

इचलकरंजी - फाय ग्रुपचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष पंडितराव दाजी कुलकर्णी (वय 92) यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. फाय फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शहराचे नाव जगभर लौकिक केले.
पंडित काका या नावाने ते ओळखले जात. उद्योग समूहाच्या माध्यमातून इचलकरंजीचे नावलौकिक जगभर पंडित काका यांनी केले होते. फाय प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या उद्योगसमूहात सुमारे पंचवीस कंपन्या आहेत.जपानच्या केहींन या कंपनीबरोबर त्यांनी केहीन - फाय असा संयुक्त उद्योग प्रकल्प पुणे येथे सुरू केला.पंडीत काका यांनी विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल भारतीय व्यक्तींचा गौरव करण्याच्या हेतूने फाय फाउंडेशनची स्थापना केली. 

वाचा - एकेकाळी वर्चस्व गाजविणारा महाराष्ट्राचा फुटबॉल संघ यंदाही आयलीगमध्ये नाहीच...

यातील सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रभूषण पुरस्कार या नावाने दिला जातो. हे पुरस्कार दर वर्षी इचलकरंजी येथे एका भव्य समारंभात एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या हस्ते दिले जातात. 30 ते 40 वर्षे या पुरस्काराच्या माध्यमातून देशभरातील अनेक  विविध क्षेत्रातील नामांकिताना या ठिकाणी त्यांनी पुरस्कार दिले. या पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अभिनेते दिलीप कुमार, उद्योगपती राहुल बजाज उपस्थित राहिले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मानही त्यांनी  पहिल्यांदा या शहरात मिळवला होता. फाउंडेशन च्या माध्यमातून देशातील अनेक आपत्तीच्या वेळी मोठा निधी त्यांनी शासनाला व विविध संस्था कडे सुपूर्द केला होता.
काल त्यांना त्रास झाल्यामुळे कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Well known fi group president Panditrao Kulkarni passed away