
जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर या तीर्थक्षेत्रावर भाविकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. अगदी सावलीसाठी दर्शन मंडप ते स्वच्छतागृह या अडचणी सतावत आहेत. मुख्य म्हणजे दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढू लागल्यामुळे जोतिबाच्या मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात कमी प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने भाविकांचा श्वास गुदमरतो आहे.
मंदिरात वातानुकुलित यंत्रणा बसविण्या विषयी केवळ चर्चा होते पण आजपर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही. भाविकांच्या त्रासाचे शासकीय यंत्रणेस काही नाही निमूटपणे सर्व भाविक हा त्रास सहन करत आहेत . जोतिबाच्या मंदिरात पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे गुदमरणे, चक्कर येणे, रक्तदाब वाढणे या घटना सर्रास घडत असल्याने भाविक त्रस्त आहेत.
प्रथमोउपचाराची सोय नाही
प्रथमोउपचार करण्यासाठी मंदीर परिसरात व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात सोयच नाही. त्यामुळे रुग्णाला उचलून पायरी वाटेने डोंगरावरील मिनी सरकारी दवाखान्यात न्यावे लागते. या प्रकारामुळे अनोळखी भाविक गोंधळून व घाबरून जातात. मंदिर परिसरात तात्काळ उच्च सोय आवश्यक आहे,जोतिबा चैत्र यात्रेतील आढावा बैठकित फक्त यासंदर्भात चर्चा होते पण कार्यवाही काही होताना दिसत नाही. येरे माझ्या मागल्या असा प्रकार वर्षानुवर्षे डोंगरावर दिसतो आहे.चोपडाई देवी, महादेव, नंदी, जोतिबा या मंदिरांचा समूह असून ही मंदिरे हेमांडपंथी शैलीतील आहेत. या मंदिराचा आवार छोटा आहे. दोन दरवाजे आहेत. त्यामुळे मंदिरात हवा खेळती राहत नाही.
मंदिरात श्वास गुदमरतो
पूर्वी या मंदिराची उभारणी करताना कारागिरांनी मंदिराच्या पश्चिम व पूर्व बाजूला हवा खेळती राहण्यासाठी झरोके ठेवले आहेत. पण ते कालांतराने मुजले आहेत झरोके शोधून ती मोकळी करणे गरजेचे आहे.डोंगरावर दिवसेंदिवस मोठी गर्दी वाढत आहे. सकाळीच तीन चार पदरी रांगेतून भाविकांना दर्शन घ्यावे लागते. दर्शन मंडपाची सोय नसल्याने मंदिराभोवती उभे राहूनच ताटकळत दर्शन घेण्याशिवाय त्यांना पर्यायच नाही. दर्शनासाठी येणारे भावीक प्रथम तुळशी, नंदी, महादेव, चोपडाई या मंदिरातून जोतिबाच्या मुख्य मंदिरात जातात. तेथे गेल्यावर रांग थोडी थांबते.परिणामी, मुख्य मंदिरात चेंगराचेंगरी ढकलाढकली असे प्रकार घडतात. मंदिरात वातानुकूलित यंत्रणा नसल्यामुळे भाविक घामाने चिंब होतात. त्यांचा श्वास गुदमरतो. मंदिरातून कधी एकदा बाहेर येतो असे त्यांना वाटते.
झरोके चा शोध घेणार का ?
मंदिरातून बाहेर आल्यावर भाविक सावलीचा आधार घेतात मग त्यांना थोडे बरे वाटते. अशी सध्या स्थिती आहे .या मंदिरात फक्त मोठे पंखे लावले आहेत त्यातून केवळ गरम हवा येते. त्यामुळे सर्रास भाविक घामाने चिंब होतात. भाविकांच्या या गैरसोयीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दररोजच्या या वाढत्या गर्दीमुळे मंदिरात कोंदटपणा वाढतो आहे . त्यामुळे महादेव, ,चोपडाई, जोतिबा, मंदिरात कायमस्वरूपी वाताणुकूलीत यंत्रणा बसल्यास भाविकांचा श्वास कोंडणार नाही. जोतिबाची चैत्र यात्रा ७ एप्रिल होत असून या पूर्वी उपाय योजना झाल्यास हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल.पूर्वी जोतिबा मंदिराची उभारणी करताना कारागीरांनी मंदिराच्या पश्चिम व पूर्व बाजूला हवा खेळती राहण्यासाठी झरोके ( लहान खिडकी )ठेवले होते. ते आता पूर्णपणे मुजले आहेत .त्या झरोक्यांचा शोध घेतल्यास मंदीराचा कोंदटपणा थोडा कमी होईल व हवा खेळती राहील असे जाणकरांनी सांगितले
तंज्ञाच्या मदतीने उपाय
मंदिरात वाताणुकुलीत यंत्रणा बसविण्यासाठी पाश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती प्रयत्नशील आहे. मंदिर पूर्णपणे दगडी असल्याने अडचणी येत आहेत. तरीसुद्धा तंज्ञाच्या आधारे या वर उपाय शोधला जाईल.
महादेव दिंडे ,अधिक्षक, देवस्थान समिती कार्यालय, जोतिबा डोंगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.