त्येला काय हुतयं ?, नको, कोरोना योध्दा बनू या, आमदार ऋतूराज पाटील यांचे भावनिक आवाहन

 What happened to him? No,
What happened to him? No,
Updated on

कोल्हापूर ः कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. समूह संसर्ग प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत येवून ठेपला आहे. प्रशासनाने खबरदारीचे आवाहन केले असले तरी काही जणांकडून बेजबाबदारपणे सुरू असलेल्या गोष्टींच्या पार्श्‍वभूमीवर आमदार ऋतूराज पाटील यांनी आता सोशल मीडियावरून भावनिक आवाहन केले आहे. "त्येला काय हुतयं' ही पारंपरिक कोल्हापुरी मानसिकता बदलूया आणि प्रत्येकाने स्वतः कोरोना योध्दा बनूया, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोशल मीडियावर ते चांगलेच व्हायरल झाले आहे. 
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनाबरोबरच विविध सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. एकीकडे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत असताना बाधितांचा आकडा ही रोज पाचशेच्यावर निघाला आहे. त्यातही आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. काही जणांकडून खबरदारीचे उपाय अवलंबले जात नसल्याची स्थिती आहे. मित्रमंडळीबरोबर चहाच्या टपरीवर एकत्र चहा घेणे, मोकळ्या मैदानावर तासन्‌तास खेळणे, अंत्यसंस्काराला मोजक्‍याच लोकांची उपस्थिती बंधनकारक असताना अनावश्‍यक गर्दी करणे, दारात, चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसणे, विवाहासाठी मोजक्‍याच लोकांची उपस्थिती असावी, असा नियम असतानाही अनावश्‍यक गर्दी करणे आदी प्रकार वाढतच आहेत. लॉकडाऊनच्या काळात खबरदारी घेतली. पण, आता कोरोना दारात आल्यानंतर खबरदारी न घेता "त्येला काय हुतयं' असा प्रतिप्रश्‍न केला जातो आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार श्री. पाटील यांनी सर्वांनाच "पुन्हा एकदा आमचं ठरलयं, कोरोनाला तटवायचंय' अशी भावनिक साद घातली आहे.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com