वीजयंत्रणेच्या ताबडतोब दुरुस्तीसाठी आता नागरिकांना व्हाॅट्स अॅप हे माध्यम...

WhatsApp is now a medium for citizens to repair electrical appliances immediately in kolhapur
WhatsApp is now a medium for citizens to repair electrical appliances immediately in kolhapur

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी महावितरणने नागरिकांना मोबाईलद्वारे व्हॉटस् ॲपचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

महावितरणचे पुणे प्रादेशिक प्रभारी संचालक अंकुश नाळे यांनी याबाबत परिपत्रक काढले असून, व्हॉटस् अॅपद्वारे मिळालेल्या फोटो व तक्रारींनुसार वीजयंत्रणेची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी व  संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात यावे, असा आदेशही त्यांनी दिला आहे.
वीजतारा तुटणे, झोळ पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा तक्रारी अॅपद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत.
तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून व शक्य असल्यास स्थळाच्या लोकेशनसह नागरिकांनी व्हॉटस् अॅपच्या मोबाईल क्रमांकावर पाठवता येणार आहे. या स्वरुपाच्या तक्रारींसाठी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील सध्या सुरु असलेली सेवा उपलब्ध राहील.

व्हॉटस् ॲपद्वारे महावितरणच्या मोबाईल क्रमांकावर आलेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. तक्रारीनुसार वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉटस् ॲपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येणार आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे.

या नंबरवर द्यावी माहिती

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 7875769103 हा व्हॉटस् ॲप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याच्याच फोटोसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी कॉल करू नये. फक्त व्हॉटस् ॲपद्वारे माहिती द्यावी, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या नागरिकांकडे व्हॉटस् ॲप नाही, त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com