घऱ, प्लॉट खरेदी करताय, फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या दक्षता

प्रतिनिधी
मंगळवार, 30 जून 2020

संशयित विजय जरग हा मुक्त सैनिक वसाहत येथे राहतो. त्याने विजय प्रकाश पाटील (वय 43, रा. ताराबाई पार्क) यांना रमणमळा येथील मिळकत असल्याचे सांगितले. त्याच्यात यासंबंधीचा व्यवहार ऑक्‍टोबर 2011 पासून सुरू झाला.

कोल्हापूर ः मिळकत नावावर नसतानाही खरेदी करारपत्राद्वारे 22 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत एकावर गुन्हा दाखल झाला. विजय तानाजी जरग (रा. मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, संशयित विजय जरग हा मुक्त सैनिक वसाहत येथे राहतो. त्याने विजय प्रकाश पाटील (वय 43, रा. ताराबाई पार्क) यांना रमणमळा येथील मिळकत असल्याचे सांगितले. त्याच्यात यासंबंधीचा व्यवहार ऑक्‍टोबर 2011 पासून सुरू झाला. जरगने मिळकती संबंधितचे पाटील यांना 72 लाख 1 रुपयांचे खरेदीपत्रही करून दिले. पाटील यांनी त्यापैकी 22 लाख 1 रुपयांची रक्कम जरगला दिली. पण ही मिळकत दुसऱ्याच्याच नावावर असल्याचे उघड झाले. जरगने अद्याप मिळकती संबंधिताचा व्यवहार पूर्ण करून दिला नसल्याने आपली फसवणूक झाल्याची फिर्याद विजय पाटील यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. त्यानुसार संशयित जरगवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास सहायक फौजदार राजू वरक करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When buying a house or plot, take precautions to avoid fraud