पुस्तके वाचता वाचता...ती झाली स्टोरीटेलर 

While reading books ... she became a storyteller
While reading books ... she became a storyteller
Updated on

कळंबा : मृणाल धनंजय पाटील, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलची नववीची विद्यार्थिनी. कोरोनाच्या लॉकडाउन काळात शाळा नाहीच. मग, गोष्टींची पुस्तके वाचायला सुरवात केली आणि ही पुस्तके वाचता वाचता स्टोरी टेलिंगची संकल्पना तिच्या डोक्‍यात आली. मग, वेगवेगळे प्रयत्न सुरू झाले. केवळ गोष्ट सांगून चालणार नाही, तर त्यासाठी आवश्‍यक ऍनिमेशन, विविध चित्रे शोधून काढली आणि एडिटिंग ऍप मोबाईलवर डाउनलोड करून एडिटिंगही तिने स्वतःच केले. मृणालच्या याच गोष्टी आता यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बालमित्रांसाठी मनोरंजन करता करता सामाजिक जाणिवा समृद्ध करण्यासाठीही उपयुक्त ठरत आहेत. 

लॉकडाउनमधील पहिला प्रयोग म्हणून मृणालने वडील धनंजय यांच्याबरोबर "कर हर मैदान फतेह' या गाण्याचा व्हिडिओ करायचा ठरवला. त्यात घरातील सर्व सदस्यांना सामावून घेतले. हे गाणं सोशल मीडियावर शेअर झाले आणि सर्वांनीच कौतुक केले. दुसरा प्रयत्न म्हणून "जय जगत' या हिंदी कवितेचा व्हिडिओ केला. तोही सर्वांना आवडला. मग, आत्मविश्‍वास आणखीच वाढत गेला आणि तिने गोष्टींची संकल्पना मांडताच घरच्यांनीही ती उचलून धरली.

"द इनोसंट कॅमल' ही गोष्ट पहिल्यांदा वाचली आणि त्यानंतर साऱ्या तांत्रिक गोष्टीही तिनेच कराव्यात, असा आग्रह घरच्यांनी धरला. मृणालने या साऱ्या गोष्टी मनापासून केल्या आणि अखेर "यूट्यूब'वर ही गोष्ट अपलोड झाल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांनी तिला आणखी बळ दिले. एका इंग्रजी गोष्टीनंतर तिने दुसरी मराठीतील "एक्की दोक्की' ही गोष्ट निवडली आणि तीही अपलोड केली. 

गोष्टींची आवड पहिल्यापासूनच आहे. मात्र, लॉकडाउनमुळे त्या केवळ स्वतः वाचण्याबरोबरच इतरांनाही त्याचा आनंद मिळावा, या उद्देशाने मी व्हिडिओ केले. त्याचे कौतुक झाले आणि त्यातून आत्मविश्‍वासही वाढत गेला. 
- मृणाल पाटील 

दृष्टिक्षेप 
- लॉकडाउनमध्ये मृणालने जपला गोष्टीची पुस्तके वाचनाचा छंद 
- पुस्तके वाचताना सुचली स्टोरी टेलिंगची संकल्पना 
- अनिमेशन, चित्रे शोधून काढली 
- एडिटींग ऍप डाऊनलोड करून स्वतःच केले एडिटींग 
- युटयुबच्या माध्यमातून सांगतेय गोष्टी 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

कोल्हापूर

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com