केंद्रीय पथक कशासाठी येतयं कोल्हापुरात.......वाचा

Why is the Central Squad coming to Kolhapur
Why is the Central Squad coming to Kolhapur
Updated on

कोल्हापूर : केंद्राचे एक पथक राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. पथक आठवडाभर कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, पालघर, सोलापूर व कोल्हापूरचा समावेश आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे संयुक्‍त सचिव कुणाल कुमार, एम्स नागपूर येथील प्रो. डॉ. अरविंद कुशवाह व डॉ. सितीकांता बॅनर्जी यांचे पथक आहे. त्यांचा दौरा सुरू झाला असून ते दोन-तीन दिवसांत येथे येण्याची शक्‍यता आहे. या निमित्ताने जिल्हा आरोग्य विभाग व प्रशासनाची तयारी सुरू आहे. 

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठिकाणी केंद्राने पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 12 राज्यात पथके जात आहेत. पथक संबंधित राज्यातील सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या महापालिका व जिल्हा प्रशासनाचा आढावा घेणार आहे. आरोग्यच्या पोर्टलमधील अडचणी, आरटीपीसीआर, सी. व्ही. ऍनॅलिटिक्‍स यासह आरोग्य सेतू ऍपची माहिती घेतली जाणार आहे.

पथकाला कोणत्या प्रकारची माहिती सादर करायची आहे, त्याचे परिपत्रकही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील, महापालिका क्षेत्रातील कोरोनाची एकूण संख्या, कालावधी, भौगोलिक विस्तारात असलेले रुग्ण, रुग्णांमध्ये असलेले विविध आजार, रुग्णांचे वर्गीकरण, अलगीकरण कक्षाबाहेरील रुग्ण, संपर्कातून व संपर्क यादीत नसलेले रुग्ण, आदी माहिती पथक घेणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचीही संपूर्ण माहिती संकलित केली जात आहे. कन्टेन्मेंट झोनबाबतचा तपशील मागवण्यात आला आहे, तसेच त्याची लोकसंख्या, पॉझिटिव्ह रुग्ण, घरोघरी झालेले सर्वेक्षण, प्रवासाची माहिती, परजिल्ह्यातून आलेले लोक आदींचीही माहिती घेतली जाईल. 
पथकाकडून जिल्ह्यातील कोविड सेंटरची माहिती घेतली जाणार आहे. खासगी रुग्णालयातील व्यवस्था, शासनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजना, यासाठी करण्यात आलेली खरेदी, याचीही माहिती घेतली जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com