कोल्ह्पूर जिल्ह्यात शेतीच्या खातेफोडीत विक्रमी वाढ का झाली?जाणून !

 Why there was a record increase in agricultural account burglary in Kolhapur district? Know!
Why there was a record increase in agricultural account burglary in Kolhapur district? Know!
Updated on

कोल्हापूर : शेत जमिनीची खातेफोड प्रक्रिया सुलभ झाल्याने मागील अडीच वर्षांत विक्रमी खातेफोड झाली आहे. या काळात तब्बल 3 लाख 15 लाखांनी खातेफोड केली आहे. वर्षाला जवळपास सव्वा ते दीड लाख लोक खातेफोड करत आहेत. हक्‍काची जमीन स्वत:च्या नावाने करत असतानाच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीही खातेफोड होत आहे. जेवढा शेतकरी छोटा, जमीन धारण क्षेत्र कमी तेवढा जादा लाभ, असेच काहीसे धोरण राज्य आणि केंद्र शासनाचे असल्याने खातेफोडीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, जमिनींचे तुकडे होऊ लागल्याने याचा फटका शेतीच्या यांत्रिकीकरणावर होत आहे. त्यामुळे समूह, गटशेतीस चालना देणे आवश्‍यक आहे. 
गावागावांत आणि घराघरांत चर्चिला जाणारा विषय म्हणजे खातेफोड. पिढ्यान्‌पिढ्या घरातील कर्त्या माणसाकडे जमिनीचे हस्तांतरण होत आले. कर्त्या व्यक्‍तीच्या मागे बऱ्याच वेळा जमिनीच्या वाटणीवरून वादविवाद, हाणामाऱ्या आणि खटलेही झाल्याची उदाहरणे गावागावांत आहेत. त्यामुळे कर्त्या माणसांनी स्वत:च्याच हयातीत जमिनीची वाटणी करण्याची प्रक्रिया अलीकडच्या काळात रूढ झाली. तर मागील चार-पाच वर्षांत खातेफोड करण्याचा किचकट प्रकार दुरुस्त करण्यात आला. अत्यंत साध्या व सुलभ पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय तत्कालीन जमाबंदी आयुक्‍तांनी घेतला. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. 

गावागावांतून खातेफोड करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज दाखल होत आहेत. जिल्ह्यात मागील अडीच ते तीन वर्षांपूर्वी 6 लाख 60 हजार खातेदार होते. आज ही संख्या 9 लाख 75 हजार इतकी झाली आहे. अजूनही खातेफोड करणाऱ्यांची वाढ अशीच चालू राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागातून व्यक्‍त होत आहे. शासनाने अनुदान, सवलती व महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना जे कर्जमाफी देण्याचे धोरण घेतले आहे. त्याचा सर्वाधिक लाभ हा अल्पभूधारकांना होतो. यामुळेही खातेफोड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले. 
... 
खातेफोड होण्याची कारणे 
किचकट असलेली प्रक्रिया सुलभ झाली 
आपल्यानंतर वादविवाद होऊ नये म्हणून खातेफोड 
स्वत:च्या हक्‍काची जमीन असावी 
शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी 
... 
खातेफोडीचे फायदे 
खातेफोडीवरून कुटुंबात व भाऊबंदात होणारा गृहकलह थांबण्यास याची मदत झाली आहे. स्वत:च्या हक्‍काची जमीन नावावर झाल्याने कसण्याचा उत्साह वाढला आहे. शेतीतील प्रयोग करण्यास संधी आहे. शासनाच्या अनुदानाच्या योजना, कर्जमाफी या योजनांचा फायदा कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्‍तींना होत आहे. 

खातेफोडीचे तोटे 
शेतीची विभागणी तुकड्यांत झाल्याने सर्वात मोठी अडचण आहे ती यांत्रिकीकरणाची. शेत कामासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. अशा काळात यांत्रिकीकरणास चालना आवश्‍यक आहे. शासन सामुदायिक शेती, शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांसाठी विविध योजना आणत आहेत. मात्र, शेतीच्या होत चाललेल्या तुकड्यांमुळे याचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळेच आता एकत्रित शेती, गटशेती यासाठी चालना देणे आवश्‍यक आहे.

-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com