काय होणार? राजू शेट्टी आमदारकी स्वीकारणार का?

Will Raju Shetty accept MLA offer for ncp
Will Raju Shetty accept MLA offer for ncp
Updated on

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून विधानपरिषदेची आॅफर आल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, असे बोलले जात आहे. परंतु, खरच राष्ट्रवादीकडून अशी आॅफर असेल तर दोन वेळा खासदार राहिलेले शेट्टी स्वत:ही आॅफर स्वीकारून आमदार होतील की संघटनेतील एखाद्या कार्यकर्त्याला आमदार होण्याची संधी देतील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राष्ट्रवादीशी आघाडी झाली होती. त्यावेळी विधानपरिषदेची  एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिले होते, असे बोलले जात आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते डॉ. महावीर अक्कोळे यांनी शरद पवार यांना एक पत्र लिहून 'ठरल्याप्रमाणे एक जागा द्यावी.'अशी मागणी केली होती. 

राजू शेट्टी यांनीही शदर पवार यांना याबाबत आठवण करून दिली होती. गेल्या महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संधी मिळेल अशी चर्चा होती, पण तसे झाले नाही. राज्यपालनियुक्त १२ जागांपैकी एक जागा मिळेल असे सांगितले जात होते. आता ही वेळ आली आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार का? असा प्रश्न आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन 'विधानपरिषदेची ऑफर दिल्याचे वृत्त चर्चेत आहे. त्यामुळे शेट्टी ही आॅफर स्वीकारणार का? आणि स्विकारली तर त्यासाठी कोणाला संधी देतील यावर जोरदार चर्चा होत आहे. 

दरम्यान, राष्ट्रवीदीकडून आॅफर देताना या जागेवर शेट्टी यांनीच जावे, अशी अट घातल्याची चर्चा आहे. परंतु, या जागेसाठी शेट्टी नसतील तर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, अनिल मादनाईक, रविकांत तुपकर, यापैकी कोणाचा तरी विचार होईल अशीही दुसऱ्या बाजुला चर्चा आहे. 

याबाबत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''राजू शेट्टी हे पक्षाचे प्रमुख आहेत. राष्ट्रवादीच्या आॅफरवर ते नक्कीच योग्य निर्णय घेतील. ते सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत''
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com